मुंबई, 25 जानेवारी : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं. यासह त्याने शतकांचा दुष्काळही संपवला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने तिसरा एकदिवसीय सामना 90 धावांनी जिंकला आणि मालिका ३-० अशी जिंकली. मात्र, सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा भडकला.
स्टार स्पोर्स्टने त्यांच्या शोमध्ये रोहित शर्माचं तीन वर्षातलं पहिलं शतक असल्याचं सांगितलं यावर रोहित शर्मा नाराज दिसून आला. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा या प्रश्नावर चिडला आणि ब्रॉडकास्टर्सना फॅक्ट लपवल्याबद्दल आणि योग्य माहिती न दाखवल्यानं सुनावलं.
हेही वाचा : U19 Women World Cup : टीम इंडिया सेमीफायनलमध्ये, न्यूझीलंड किंवा इंग्लंडविरुद्ध होणार सामना
रोहितने अखेरचं एकदिवसीय शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020 मध्ये केलं होतं. एका पत्रकाराने त्याला एकदवसीय क्रिकेटमध्ये 29 व्या आणि 30व्या शतकात 3 वर्षांचं अंतर असल्याबाबत विचारताच रोहित शर्मा नाराज झाला. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल अपडेट दिल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, मी तीन वर्षात फक्त 12 एकदिवसीय सामने खेळलो. त्यामुळे तीन वर्षे खूप वाटतात.
तुम्हाला माहिती असायला हवं की, काय होत आहे. मला माहिती आहे टीव्हीवर हे दाखवलं होतं आणि कधी कधी ब्रॉडकास्टर्सनी योग्य गोष्टी दाखवायला हव्यात. आम्ही गेल्या पूर्ण वर्षभरात एकदिवसीय क्रिकेट खेळलेलं नाही. फक्त टी२० क्रिकेटवर लक्ष दिलं असंही रोहित शर्मा म्हणाला.
शतक केल्यानंतर पुनरागमनाच्या प्रश्नावर रोहित शर्माने म्हटलं की, कसलं पुनरागमन? मला समजलं नाही. ओह, कुणी तरी सांगितलं असेल. तुम्हा पाहा गेल्या तीन वर्षातील ८ महिने तर सर्व सामने घरीच होते.आम्ही फक्त टी२० क्रिकेट खेळलं आणि टी२० क्रिकेटमध्ये आजकाल सूर्यकुमार यादवपेक्षा चांगली फलंदाजी कुणीच करत नाहीय. त्याने २ शतके केली आहेत आणि मला वाटत नाही की आणखी कुणी शतक केलंय. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं तर मी श्रीलंकेविरुद्ध फक्त दोन सामने खेळले आहेत. त्यानतंर दुखापत झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rohit sharma