मुंबई, 25 जानेवारी : भारताने महिला अंडर19 टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. ग्रुपमध्ये भारत पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे. आता शुक्रवारी सेमीफायनल होणार असून भारताची लढत न्यूझीलंड किंवा इंग्लंड यांच्याशी होईल.भारतासोबत ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि युएई होते. ग्रुपमध्ये प्रत्येक संघाला चार सामने खेळायचे होते. यात प्रत्येक संघाने किमान एक सामना गमावला आहे. तर पॉइंट टेबलमध्ये बांगलादेश आणि युएई यांच्याशिवाय इतर संघांनी सर्व सामने खेळले आहेत.
भारत आणि युएई सध्या 6 पॉइंटसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. जर आज बांगलादेशने विजय मिळवला तर त्यांचेही 6 पॉइंटस होतील. त्यांची धावगती असेल तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येईल. तर भारत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी येईल.
हेही वाचा : अजूनही पंतचीच हवा! आयसीसी पुरुष कसोटी संघात एकमेव भारतीय खेळाडूला स्थान
दरम्यान, यजमान दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं. दक्षिण आफ्रिकेचेही पॉइंट टेबलमध्ये 6 पॉइंट आहेत. आता त्यांनी सेमीफायनल गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा होता. पण ते फक्त एका धावेने जिंकले.
ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ग्रुपमध्ये न्यूझीलंडने त्यांचे सर्व सामने जिंकले असून 8 गुणांसह ते टॉपला आहेत. तर इंग्लंडनेसुद्धा आतापर्यंतचे सामने जिंकून 6 पॉइंट मिळवले आहेत. इंग्लंडचा अखेरचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. जर इंग्लंड जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये ते न्यूझीलंडच्या वरती येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket