मुंबई, 02 फेब्रुवारी : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हे दोघेही पाचव्या सामन्यात मैदानात उतरले नव्हते. भारताने मालिका जिंकल्याने चौथ्या आणि पाचव्या सामन्यात संघात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतली होती. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला मात्र दुखापतीमुळे संघातून बाहेर बसावं लागलं. पाच टी-20 सामन्यांची मालिका 5-0 ने जिंकून भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. या सामन्यावेळी विराट आणि केन विल्यम्सन एकत्र बसलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे दोघेही पाण्याच्या बाटल्या घेऊन वॉटर बॉय झालेले दिसले. हा फोटो व्हायरल होत असून यावर वेगवेगळ्या कमेंटही केल्या जात आहेत.
#SpiritOfCricket 🙌🙌#NZvIND pic.twitter.com/97kkQP8y02
— BCCI (@BCCI) February 2, 2020
बीसीसीआय़ने स्पिरिट ऑफ क्रिकेट असा कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी म्हटलं आहे की, हे जगातील सर्वात महागडे वॉटर बॉय आहेत. एका युजरने तर दशकातील सर्वोत्तम फोटो मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही असंही म्हटलं.
केन विल्यम्सन आणि विराट कोहली यांच्यासोबत ऋषभ पंत असल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे. दोन दिग्गजांसोबत पंत बसल्यानं त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
@RishabhPant17 is a needless EXTRA in this pic as he is in the Indian Team!! #NZvIND #NZvsIND #TeamIndia
— Dr. Shubham Misra 🧠⚛️🇮🇳🇺🇸 (@Shubham_Neuro) February 2, 2020
काहींनी हा फोटो क्रॉप केला असता तर आणखी सुंदर आला असता असं म्हटलं आहे. केएल राहुलची न्यूझीलंडविरुद्ध कमाल, विराट कोहलीला टाकलं मागे हा तर षटकारच होता पण सुपरमॅन संजू सॅमसनने केली कमाल, VIDEO एकदा बघाच

)







