मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND VS NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली; या खेळाडूंना मिळाली भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये संधी

IND VS NZ : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली; या खेळाडूंना मिळाली भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये संधी

24 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक पारपडली असून न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Pawar

मुंबई, 24 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज 24 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक पारपडली असून न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दुपारी 1 :30 वाजता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक झाल्यावर भारताच्या प्लेयिंग 11 विषयी सांगितले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्लेयिंग 11 मधून विश्रांती देण्यात आली आहे. त्या ऐवजी यावेळी संघात उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली.

मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका देखील आपल्या नावावर केलीच आहे. परंतु आजच्या तिसऱ्या सामन्यानंतर भारताच्या मालिका विजयावर अंतिम मोहर लागेल. श्रीलंके प्रमाणे भारतीय संघ या मालिकेतही न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे.

भारताची प्लेयिंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक

न्यूझीलंडची प्लेयिंग 11 :फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

First published:

Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Team india, Yuzvendra Chahal