मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ जिथे रचला इतिहास त्याच मैदानात पुनरागमन, जयंत आणि मुंबई यांच्यात आहे खास कनेक्शन

IND vs NZ जिथे रचला इतिहास त्याच मैदानात पुनरागमन, जयंत आणि मुंबई यांच्यात आहे खास कनेक्शन

jayant yadav

jayant yadav

टीम इंडियामध्ये 4 वर्षानंतर पुनरागमन केलेल्या जयंत यादवचे (Jayant Yadav)मुंबईशी आहे खास कनेक्शन.

मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. दरम्यान, या टेस्ट मॅचपूर्वी टीम इंडियाल दुखापतीचे ग्रहण लागले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे तीन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे आऊट झाले. त्यांच्या जागी विराट कोहली (Virat Kohli), जयंत यादव (Jayant Yadav) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे 4 वर्षानंतर जयंत यादवचे संघात पुनरागमन झाले आहे.

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या जयंत यादवचं तब्बल 57 महिन्यानंतर टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तो यापूर्वी फेब्रुवारी 2017 साली शेवटची टेस्ट मॅच खेळला होता.

जयंत आणि मुंबई यांच्यात आहे खास कनेक्शन

मुंबई आणि जयंत यांचे विशेष नाते आहे. चार वर्षानंतर त्याच मैदानावर तो परतत आहे. चार वर्षांपूर्वी याच मैदानावर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव शतक झळकावले होते. जयंतने 8 ते 12 डिसेंबर 2016 दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले.

या शतकामुळे भारताला मजबूत धावसंख्या मिळाली, त्यानंतर भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 400 धावा केल्या होत्या. भारताची फलंदाजीही उत्कृष्ट होती.

सलामीवीर मुरली विजयने 136 धावा केल्या होत्या, तर कर्णधार विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावताना 235 धावा केल्या होत्या.

जयंत नवव्या क्रमांकावर उतरला होता आणि त्याने कर्णधार विराटसोबत नवव्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली. त्याने येथे 104 धावा केल्या, ज्यासाठी त्याने 204 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकार मारले. यासह, तो भारताकडून कसोटीत 9 व्या क्रमांकावर खेळताना शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

जयंत यादवनं आजवर 4 टेस्ट खेळल्या असून 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर 1 सेंच्युरी आण् 1 हाफ सेंच्युरीसह 228 रन केले आहेत. त्याचे बॅटींमधील कौशल्य पाहूनच ऑल राऊंडर रविंद्र जडेजा जखमी झाल्यानंतर त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

First published:

Tags: 2nd test series, Team india, Test series, Wankhede stadium