मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : सीनियर खेळाडूंच्या कमबॅकने वाढलं कॅप्टनचं टेन्शन, रोहित कशी निवडणार Playing XI

IND vs ENG : सीनियर खेळाडूंच्या कमबॅकने वाढलं कॅप्टनचं टेन्शन, रोहित कशी निवडणार Playing XI

भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी टी-20 मॅच (India vs England 2nd T20) शनिवारी एजबॅस्टन क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे,  पण कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) सीनियर खेळाडूंचं कमबॅक डोकेदुखी ठरू शकतं, कारण पहिल्या सामन्यात या खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली.

पुढे वाचा ...

लंडन, 8 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी टी-20 मॅच (India vs England 2nd T20) शनिवारी एजबॅस्टन क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पहिल्या टी-20 मध्ये विजय मिळवेल्या भारताला दुसरा सामना जिंकून सीरिजही खिशात टाकण्याची संधी आहे, पण कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) सीनियर खेळाडूंचं कमबॅक डोकेदुखी ठरू शकतं, कारण पहिल्या सामन्यात या खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. आता दुसऱ्या टी-20 मध्ये सीनियर खेळाडूंना संधी द्यायची असेल, तर काढायचं कोणाला, असा प्रश्न रोहितला सतावत असेल.

रोहितसोबत किशन का हुड्डा?

रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण खेळणार, या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) हे मागच्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हुड्डाने पहिल्या टी-20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंग केली, पण विराट कोहलीच्या कमबॅकमुळे हुड्डाला तिसऱ्या क्रमांक सोडावा लागू शकतो. मग रोहित इशान किशनला ओपनिंगला संधी देणार का हुड्डाला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मिडल ऑर्डरचा पेच

रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ओपनिंग केली तर तिसऱ्या स्थानासाठी विराट कोहली आणि फॉर्ममध्ये असलेल्या दीपक हुड्डा यांच्यात स्पर्धा असेल. याशिवाय चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि पाचव्या क्रमांकावर हार्दिकचं खेळणं निश्चित आहे. सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. कार्तिकने टी-20 फॉरमॅटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये धमाका केला आहे, तर पंत टेस्टमध्ये शतक आणि अर्धशतक करून परतला आले. याशिवाय सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यात रेस आहे.

या पाच बॉलरना संधी?

दुसऱ्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराह मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. बुमराहसोबत भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल हे फास्ट बॉलर खेळतील, हे निश्चित मानलं जात आहे. तर स्पिनर म्हणून युझवेंद्र चहल मैदानात उतरेल. पाचव्या बॉलरची कमी पांड्या आणि जडेजा भरून काढतील.

भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन

रोहित शर्मा, ईशान किशन/दीपक हुड्डा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा/अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

First published:
top videos

    Tags: India vs england, Rohit sharma, Team india