जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG 1st T20 : रोहित शर्माने टॉस जिंकला, अर्शदीपचं पदार्पण

IND vs ENG 1st T20 : रोहित शर्माने टॉस जिंकला, अर्शदीपचं पदार्पण

Photo-BCCI

Photo-BCCI

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England 1st T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh Debut) याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

साऊथम्पटन, 7 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs England 1st T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh Debut) याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. आयपीएलच्या मागच्या दोन मोसमांमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने धमाकेदार कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. दुसरीकडे रोहित शर्माही कोरोनातून पूर्णपणे बरा झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर रोहितची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे तो पाचवी टेस्ट खेळू शकला नव्हता. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी-20 साठी आराम देण्यात आला आहे, कारण हे तिघं परवाच झालेल्या टेस्ट टीमचा भाग होते. Live Score पाहाण्यासाठी क्लिक करा टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे, त्याआधी टीम इंडियाला ठराविक टी-20 मॅचच खेळायच्या आहेत, त्यामुळे ही सीरिज वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम तयार करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय टीम रोहित शर्मा, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल इंग्लंडची टीम जेसन रॉय, जॉस बटलर, डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टॉपले, मॅथ्यू पार्किनसन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात