जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आधी भडकला, नंतर दिलं गिफ्ट; विराटच्या वागण्याचं होतंय कौतुक

आधी भडकला, नंतर दिलं गिफ्ट; विराटच्या वागण्याचं होतंय कौतुक

आधी भडकला, नंतर दिलं गिफ्ट; विराटच्या वागण्याचं होतंय कौतुक

दुसऱ्या कसोटीत मेहदी हसनने विराटला एका धावेवर बाद केलं होतं. तेव्हा विराट मेहदी हसनसह बांगलादेशच्या खेळाडुवर भडकलासुद्धा होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर : भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप केलं. भारताला 145 धावांचे आव्हान पूर्ण करताना एकवेळ अशी आली होती की, संघाचे 7 फलंदाज 74 धावांवर बाद झाले होते. यानंतर आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी अभेद्य भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटर मेहदी हसन मिराज याने 5 विकेट घेतल्या. भारताचा बांगलादेश दौरा अष्टपैलू मेहदी हसन मिराजसाठी स्पेशल असा ठरला. दौरा संपल्यानंतर मेहदी हसनला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने खास असं गिफ्ट दिलं. विराटने त्याला एकदिवसीय क्रिकेटची टीम इंडियाची जर्सी गिफ्ट केली. यावर विराटने ऑटोग्राफ देत शुभेच्छा दिल्या. मेहदी हसनने हा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुसऱ्या कसोटीत मेहदी हसनने विराटला एका धावेवर बाद केलं होतं. तेव्हा विराट भडकलासुद्धा होता. हेही वाचा :  कुलदीपला ड्रॉप का केले? केएल राहुलने दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर मेहदी हसनने एकदिवसीय मालिकेत पहिल्या सामन्यात 9 गडी बाद झाल्यानंतर बांगलादेशला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलं होतं. याशिवाय गोलंदाजीत कमाल करत त्याने चौघांना बाद केलं. बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने बाद केलं होतं. मेहदी हसनला पहिल्या दोन सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला होता. तर मालिकावीरचा बहुमानही त्याने पटकावला. कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक 11 गडी बाद केले. मीरपूर कसोटीत दुसऱ्या डावात त्याने विराट कोहली, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल आणि ऋषभ पंतला बाद केलं. दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला विजयाच्या दिशेने नेलं. मात्र आर अश्विन आणि श्रेयस अय्यर हे मैदानावर टिकून राहिले. मिराजने 37 कसोटी खेळल्या असून 146 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 79 आणि टी20 मध्ये 8 विकेट त्याच्या नावावर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात