मुल्तान, 12 डिसेंबर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवला. इंग्लंडने या सामन्यासह मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. इंग्लंडने 22 वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली. तर बाबर आजमच्या संघाला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका गमवावी लागली. इंग्लंडने पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात 26 धावांनी हरवलं. यासह पाकिस्तानच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानला 328 धावांपर्यंतच मजल मारता आली. दुसऱ्या डावात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा सऊद शकीलने केल्या. त्याने 94 धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ इमाम उल हकने 60, अब्दुल्ला शफीकने 45, मोहम्मद नवाजने 45 आणि आगा सलमानने 20 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.