मुंबई, 10 डिसेंबर : ईशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावत अनेक विक्रम नावावर नोंदवले. वयाच्या 24व्या वर्षी अशी कामगिरी करत त्याने सर्वात कमी वयात आणि कमी सामन्यात द्विशतक करणारा खेळाडू असा बहुमान त्याने मिळवला. इशान किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 9 षटकार खेचले. इशान किशनच्या आधी भारताकडून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विरेंद्र सेहवाग यांनी द्विशतके केली आहेत.
भारताकडून पहिलं द्विशतक 24 फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरने केलं होतं. सचिनने 147 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या होत्या. या खेळीत सचिनने 25 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यानंतर विरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतकी खेळी केली. सेहवागने 149 चेंडूत 25 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 219 धावा केल्या होत्या.
हेही वाचा : इशान किशनचं 'शान'दार द्विशतक, गेलला मागे टाकून केला विश्वविक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम भारताचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 3 द्विशतके केली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक आणि श्रीलंकेविरुद्ध दोन द्विशतके केली आहेत. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव खेळणारा फलंदाज आहे.
हेही वाचा : नेमारने केली पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी, पण ब्राझीलच्या पराभवाने रडवले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ishan kishan, Sachin tendulaker, Virat kohali, Virender sehwag