मुंबई, 09 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा फलंदाज इशान किशनने झंझावाती द्विशतकी खेळी केली. विशेष म्हणजे सर्वात कमी चेंडूत द्विशतक करण्याचा विक्रम त्याने केला. इशान किशनने १२६ चेंडूत द्विशतक साजरं केलं. याआधीचा विक्रम गेलच्या नावावर होता. इशान किशन १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला. इशान किशनने ८५ चेंडूत शतक केलं. यात त्याने १४ चौकार आणि दोन षटकार लगावले होते. त्यानतंर पुढच्या ४१ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांसह १०० धावा पूर्ण करत द्विशतक केलं.
इशान किशनने त्याच्या खेळीत २४ चौकार आणि ९ षटकार लगावले. बांगलादेशविरुद्ध भारताने सुरुवातीच्या दोन सामन्यासह मालिका गमावली आहे. तरी तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. इशान किशन आणि विराट कोहली यांनी शिखर धवन बाद झाल्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही.
हेही वाचा : नेमारने केली पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी, पण ब्राझीलच्या पराभवाने रडवले
गेलचा विक्रम मोडला
सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम याआधी ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने १३८ चेंडूत झिम्बॉब्वेविरुद्ध द्विशतक केलं होतं. त्यानंतर विरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. सेहवागने इंदौरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १४० चेंडूत द्विशतक झळकावलं होतं. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४७ चेंडूत द्विशतकी खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket