मुंबई, 1 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारी पासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येण्याकरता रवाना झाला आहे. परंतु यावेळी ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचे विमान चुकले आणि तो आपल्या संघासोबत भारतात येऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा हा व्हिसा विलंबामुळे बुधवारी संघा सोबत भारतात येणाऱ्या विमानातून प्रवास करू शकला नाही अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिले आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाच्या संघातील एकमेव खेळाडू होता ज्याला वेळेत व्हिसा न मिळाल्याने त्याची भारतात येणारी फ्लाईट चुकली आहे.
हे ही वाचा : 'मी कधीच त्यांना...', विराट कोहलीने लता दीदींविषयी व्यक्त केली खंत
उस्मान ख्वाजा याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला असून त्याचे पालनपोषण ऑस्ट्रेलियात झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात खेळतो. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या माहितीनुसार ख्वाजाचा व्हिसा हा बुधवारी उशिरा येण्याची अपेक्षा असलयाने ख्वाजाला गुरुवारी दुसऱ्या फ्लाईटने भारतात दाखल होईल. ख्वाजा सोबत ऑस्ट्रेलिया संघाचे काही सहकारी स्टाफ देखील गुरुवारी भारतात येण्यासाठी रवाना होतील.
भारताचा व्हिजा मिळण्यास उशीर झाल्यामुळे उस्मान ख्वाजा याने त्याच्या सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बागेत खुर्चीवर बसलेल्या माणसाचा फोटो शेअर करून त्याला "मी देखील असाच भारताचा व्हिसा मिळण्याची वाट पाहत आहे..." असे कॅप्शन दिले.
View this post on Instagram
9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 9 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत ही कसोटी मालिका खेळवली जाणार असून यात कोणता संघ विजयी होत हे पाहाण महत्वाचं असणार आहे. यातील पाहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी पर्यंत विदर्भ क्रिकेट स्टेडीयमवर खेळवण्यात येईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, Cricket news, India vs Australia, Test cricket