मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS AUS : भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद

IND VS AUS : भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद

भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद

भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्ली येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच भारताच्या अनुभवी गोलंदाजां समोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद झाला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्ली येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या काही षटकांमध्येच भारताच्या अनुभवी गोलंदाजां समोर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद झाला आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर या सामन्याला सकाळी 9:30 च्या सुमारास सुरुवात झाली. काल ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 धावा करत 62 धावांची आघाडी घेतली होती. आज सामन्याला सुरुवात होताच कालचे नाबाद फलंदाज  ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशानेने फलंदाजीसाठी आले. परंतु भारताचा अनुभवी गोलंदाज अश्विनने ट्रॅव्हिस हेडला 13 वी ओव्हर सुरु असताना बाद केले. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताला पहिले यश मिळाले असून ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस संघासाठी 46 सिहंदूत 43 धावा करून तंबूत परतला. तर अश्विनने आपला धडाका सुरूच ठेवत स्टीव्हन स्मिथ याला 18 व्या ओव्हरमध्ये बाद केले. स्टीव्हन स्मिथ 19 चेंडूत केवळ 9 धावा करून माघारी परतला.

अश्विनने सुरु केलेला हा धडाका पुढे भारताचा अनुभवी गोलंदाज रवींद्र जडेजाने देखील सुरु ठेवला. त्याने मार्नस लॅबुशेन याची विकेट घेतली. मार्नसने 50 चेंडूत ऑस्ट्रेलियासाठी 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा अश्विनने मॅट रेनशॉ याला २३ वी ओव्हर सुरु असताना बाद केले. मॅट रेनशॉ केवळ 2 धावा करून भारतीय गोलंदाजांचा शिकार झाला.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पीटर हँड्सकॉम्ब याने मैदानात जम बसवण्यापूर्वीच रवींद्र जडेजाने त्याची विकेट घेतली. विराट कोहलीने पीटर हँड्सकॉम्ब याचा झेल पकडून त्याला शुन्यावर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूत रवींद्र जडेजाने पॅट कमिन्सची देखील विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही फलंदाजांना जडेजाने लागोपाठ शून्यावर बाद केले.

हे ही वाचा : MS Dhoni ने तमिळ अभिनेत्याला गिफ्ट केली त्याची खास बॅट

28 व्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर अॅलेक्स कॅरी 7 धावांवर असताना रवींद्र जडेजाला त्याची विकेट घेण्यात यश आले. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा  याने 5 तर आर अश्विनने भारतासाठी 3 विकेट घेतल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia, R Ashwin, Ravindra jadeja, Team india