मुंबई, 17 फेब्रुवारी : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने काही दिवसांपूर्वीच सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आहे. धोनी एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तमिळ चित्रपट ‘लेट्स गेट मॅरीड’ याची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच या चित्रपटात काम करणाऱ्या एका तमिळ अभिनेत्याला धोनीने खास गिफ्ट दिले आहे. तमिळ चित्रपट सृष्टीतील स्टार कॉमेडियन आणि अभिनेता योगी बाबा याने धोनी एंटरटेनमेंटचा पहिला तमिळ चित्रपट ‘लेट्स गेट मॅरीड’ मध्ये काम केले आहे. तेव्हा धोनीने योगी बाबूला त्याचा ऑटोग्राफ असलेली बॅट भेट दिली आहे. ही तीच बॅट आहे ज्याने धोनी नेट्समध्ये सराव करायचा. योगी बाबाने या बॅट सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात योगी बाबू व्यतिरिक्त अभिनेता हरीश कल्याण, इवाना आणि नादिया हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हे ही वाचा : क्रिकेटर पृथ्वी शॉ 23 व्या वर्षी आहे कोट्यधीश! वाचा किती आहे त्याची संपत्ती
— Yogi Babu (@iYogiBabu) February 15, 2023
Direct from #MSDhoni hands which he played in nets . Thankyou @msdhoni sir for the bat .... Always cherished with the - your cricket memory as well as cinematic memory #dhonientertainmentprod1 #sakshidhoni . pic.twitter.com/2iDv2e5aBZ
— Yogi Babu (@iYogiBabu) February 15, 2023
धोनी एंटरटेनमेंटचा पहिला तमिळ चित्रपट ‘लेट्स गेट मॅरीड’ गेल्या महिन्यात 27 जानेवारीला रिलीज होणार होता. हा कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. अभिनेते योगी बाबूंना क्रिकेटची खूप आवड असून ते अनेकदा शूटिंगमधून वेळ काढून क्रिकेट खेळताना दिसतात. योगी बाबूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत या भेटीसाठी धोनीचे आभार मानले आहेत.