सिडनी, 07 फेब्रुवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आजही जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. क्रिकेटच्या इतिहासत आजही असे रेकॉर्ड आहेत, जे फक्त सचिनच्या नावावर आहेत आणि त्यांना मोडणे कोणत्या फलंदाजासाठी सोपे नसेल. फलंदाज म्हणून 20 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर पहिल्यांदाच सचिन प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बुशफायर क्रिकेट बॅश चॅरिटी सामन्यात सचिन भाग घेणार आहे. 8 फेब्रुवारीला हा सामना होणार असून सामन्याआधी सचिनने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सचिनने एक धक्कादायक खुलासा केला.
सचिनेने मार्नसु लाबुशेनचे केले कौतुक
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले. आगीत नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी चॅरिटी सामना खेळत आहे. या सामन्यात सचिन रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) संघाचा कोच होणार आहे. याप्रसंगी बोलताना सचिन म्हणाला, की त्याची झलक ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबुशेन दिसते. लॅबुशेनचे कौतुक करताना सचिन म्हणाला, 'लबूशेनचे फुटवर्क खूपच विलक्षण आहे, त्यामुळे मला याची मला कुठेतरी एक झलक असल्याचे वाटते. त्याच्याबद्दल काहीतरी खास आहे”. आयसीसीने सचिनचे हे विधान ट्विटरवर शेअर केले आहे आणि लिहिले आहे की हे लॅबुशेनसाठी मोठी गोष्ट आहे.
A compliment to top all compliments for Australia's Marnus Labuschagne! pic.twitter.com/Rcw9QwW9zW
— ICC (@ICC) February 7, 2020
मेलबर्नमध्ये खेळला जाणार चॅरिटी सामना
मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानात बुश फायर क्रिकेट बॅश सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये लागलेल्या आगीत होरपळलेल्या लोकांच्या मदतीसाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात पाँटिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. बुश फायर क्रिकेट बॅश सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीमचा माजी खेळाडू सिस्कर किंग युवराज सिंह हा गिलख्रिस्ट इलेव्हन संघाकडून खेळणार आहे. तर दुसरीकडे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाँटिंगच्या नेतृत्वातील संघाचं कोचिंग करणार आहे.
कशी असेल प्लेईंग इलेव्हन?
Ponting XI (कोच : सचिन तेंडुलकर):मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, रिकी पाँटिंग(कर्णधार), एलिसी विलानी, ब्रायन लारा, फोइबे लिचफील्ड, ब्रॅड हॅडिन(विकेटकीपर), ब्रेट ली, वसीम अकरम, डॅन क्रिस्चियन आणि ल्यूक होग
Gilchrist XI (कोच: टिम पेन):अॅडम गिलख्रिस्ट(कर्णधार आणि विकेटकीपर), शेन वॉटसन, ब्रॅड होग, युवराज सिंह, एलेक्स ब्लॅकवेल, अँड्रयू सायमंड्स, कर्टनी वॉल्श, निक रिवोल्ड, पीटर सिडल, फावद अहमद आणि एका खेळाडूच्या नावाची घोषणा अद्याप बाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sachin tendulkar