नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : स्वामी विवेकानंदांची जगभरात महान विचारवंत हिंदू धर्मोपदेशक अशी ख्याती आहे. मानवतेच्या प्रचारात त्यांचं योगदान आहे पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं होतं! कोलकाताच्या (Kolkata) ऐतिहासिक ईडन गार्डन्स (Eden Gardens)च्या स्टेडियमवर त्यांनी ही कामगिरी बजावली होती. विवेकानंदांनी इंग्रजांविरुद्धच्या मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या. क्रिकेटच नाही तर फूटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजीमध्ये खास रस होता.
इंग्रज वि. भारतीय
स्वामी विवेकानंद जनरल असेंब्ली इन्सिट्यूटचे विद्यार्थी होते. त्यावेळी ते खेळांच्या स्पर्धेत हिरीरीने भाग घ्यायचे. 1792 मध्ये इंग्रजांनी कोलकात्यात क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. त्यानंतर दुसरा प्रसिद्ध क्रिकेट क्लब 1884 मध्ये झाला. याची स्थापना गणितज्ज्ञ सरदरंजन रे यांनी केली होती. त्यांच्या क्लबचं नाव टाउन क्लब होतं आणि त्याचं उद्दिष्ट इंग्रजांना त्यांच्याच खेळात टक्कर देण्याचा उद्देश होता. द ब्रिजच्या रिपोर्टनुसार, एका औपचारिक चर्चेत भारतीय स्वातंत्र्यसैनिक हेम चंद्र घोष यांनी स्वामी विवेकानंदांपुढे क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव ठेवला.त्यावर विवेकानंदांनी आनंदाने संमती दिली.
हेही वाचा : अशी पोहोचली टीम इंडिया फायनलमध्ये, 150 सेकंदात पाहा युवा ब्रिगेडचा विजयी प्रवास!
'भावनांमध्ये वाहून जाऊ नका'
घोष यांनी विवेकानंदांना गोलंदाजीचे धडे दिले. ईडन गार्डन्सवर झालेल्या टाउन क्लब विरुद्ध कोलकाता क्लब मॅचमध्ये स्वामी विवेकानंद टाउन क्लबच्या वतीने मैदानात उतरले. मॅच सुरू असताना घोष यांनी विवेकानंदांना सांगितलं, भावनांमध्ये वाहून जाऊ नका, गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करा. यानंतर या मॅचमध्ये विवेकानंदाचीच जादू चालली आणि त्यांनी 7 विकेट्स घेतल्या. एवढ्या सगळ्या काळात इंग्रजांच्या स्कोअरबोर्डवर फक्त 20 रन्सची नोंद झाली होती.
तरुणांसाठी प्रेरणा
आजही तरुण स्वामी विवेकानंदांना आपली प्रेरणा आणि आदर्श मानतात. स्वामी विवेकानंद जसे महान विचारवंत होते तसंच त्यांच्याकडून खेळामधल्या प्राविण्याचा आदर्शही घेण्यासारखा आहे. त्यांनी जगभरात मानवतेचा संदेश दिला आणि मानवतेच्या प्रचारासाठीच आयुष्यभराचा ध्यास घेतला.
================================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Swami vivekanand