World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

ICC Cricket World Cup पाकिस्तान कसं सेमीफायनलमध्ये पोहचू शकतं याचे मजेशीर फोटो, व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

  • Share this:

लंडन, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंडने लागोपाठ दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. त्यांचे 12 गुण झाले असून गुणतक्त्यात इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडने न्यूझीलंडला तब्बल 199 धावांनी पराभूत केलं. यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनल प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आता त्यांचा एक सामना उरला असून मोठा विजय मिळवावा लागे. यात पाकिस्तानने नाणेफेक हरली तरी ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडतील.

पाकिस्तान सेमीफायनलला पोहचण्याची शक्यता नसल्यानं आता त्यांच्यासमोर जे पर्याय आहेत त्यावरून सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्यात पाकिस्तान कसं सेमीफायनलला पोहचू शकतं याचे मजेशीर व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी लॉर्ड्सवर सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे जवळ जवळ निश्चित आहे. पाकचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक हारली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल. कारण त्यांना बांगलादेशनं एक धाव जरी काढली तरी पाक स्पर्धेतून बाहेर पडेल.

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान समोर केवळ एकच मार्ग आहे आणि तो जवळ जवळ अशक्य आहे. या सामन्यात पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी 350 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकला बांगलादेशला 38 धावसंख्येवर ऑल आऊट करावे लागेल.

पाकिस्तानने 400 धावा केल्या तर बांगलादेशचा डाव 84 धावांवर संपुष्ठात आणावा लागले. या सर्व शक्यता अशक्य आहेत.

गुणतक्त्यात पाचव्या स्थानी असलेल्या पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात विजयासह 11 गुण मिळवता येतील. मात्र, सेमीफायनलला स्थान पटकावणं कठीण आहे. यासाठी मोठ्या फरकाने त्यांना सामना जिंकणं गरजेचं आहे. बांगलादेशची वर्ल्ड कपमधील कामगिरी पाहता ते सहजासहजी सामना गमावणार नाहीत.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

First published: July 4, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या