World Cup : मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

World Cup : मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

Mahendra Singh Dhoni : धोनीने भारतीय संघाकडून आतापर्यंत 348 वनडे सामने खेळले आहेत. वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल.

  • Share this:

लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतानं बांगलादेशला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात सातव्यांदा भारत सेमीफायनलमध्ये आहे. मात्र फायनलनंतर भारताला एक मोठा धक्का बसणारा आहे. भारताला तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली वर्ल्ड कप जिंकवून देणारा 37 वर्षीय महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. याआधी धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वचषक असेल. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो".

याआधी धोनीवर अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरोधात धिम्या गतीनं फलंदाजी केल्यामुळं टीका करण्यात आली होती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही त्याच्यावर टीका केली होती. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. त्यामुळं धोनीवर सतत टीका केली जात आहे. त्यामुळं धोनी निवृत्ती घेऊ शकतो.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीची कामगिरी

धोनीने भारतीय संघाकडून आतापर्यंत 348 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 50.58च्या सरासरीने 10 हजार 723 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 10 शतके तर 72 अर्धशतक केली असून 183 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. टीम इंडियाकडून त्याने 228 षटकार मारले आहेत. धोनीने 90 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 38.09च्या सरासरीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने एक द्विशतक, 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. 224 ही त्याची कसोटीमधील सर्वोच्च खेळी आहे. टी-20 प्रकारात धोनीने 98 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या प्रकारात त्याने 37.6च्या सरासरीने 1 हजार 617 धावा केल्या आहेत. टी-20त त्याने केवळ 2 अर्धशतकी झळकावली आहेत. 56 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

असे आहे IPL करिअर

धोनीने आयपीएलमधील 190 सामने खेळले आहेत. IPLच्या करिअरमध्ये त्याने 42.21च्या सरासरीने 4 हजार 432 धावा केल्या असून 84 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

चौकार आणि षटकारांचा राजा

चौकार

वनडे-825

कसोटी-544

टी-20- 116

आयपीएल-297

षटकार

वनडे-228

कसोटी-78

टी-20- 52

आयपीएल-209

फॅन्सच्या निशाण्यावर धोनी

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपमध्ये सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. इंग्लंड विरोधात त्यानं 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या, त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्याच मैदानावर बांगलादेशविरोधात धोनीनं 33 चेंडूत 35 धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. फॅन्सच्या म्हणण्यानुसार धोनी फिनीशर म्हणून खेळत नाही. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते.

सचिननं याआधी केली होती टिका

अफगाणिस्तान विरोधात भारताच्या फलंदाजीवरून सचिन तेंडुलकरनं धोनीवर टिका केली होती. सचिननं धोनीनं चेंडू खुप खाल्ले म्हणून टिका केली होती. यावरून धोनी आणि सचिनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.

वाचा- World Cup : टीम इंडियाचं सेमीफायनल चॅलेंज, भिडणार 'या' संघाशी

वाचा- टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! 'या' चार संघांच्या स्वप्नांचा केला चुराडा

वाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

First published: July 3, 2019, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading