World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नावर पाणी पडले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 07:44 AM IST

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

लंडन, 04 जुलै: ICC Cricket World Cupमधील 41व्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा 199 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळ जवळ संपुष्ठात आल्या आहेत. पाकिस्तानचा केवळ एकच सामना शिल्लक आहे. बांगलादेशविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक हारली की ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडतील. जाणून घ्या पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण...

बांगलादेशच्या प्रथम फलंदाजीमुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर!

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी लॉर्ड्सवर सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे जवळ जवळ निश्चित आहे. पाकचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक हारली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल.

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान समोर केवळ एकच मार्ग आहे आणि तो जवळ जवळ अशक्य आहे. या सामन्यात पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी 350 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकला बांगलादेशला 38 धावसंख्यावर ऑल आऊट करावे लागेल. जर पाकिस्तानने 400 धावा केल्या तर बांगलादेशचा डाव 84 धावांवर संपुष्ठात आणावा लागले. या सर्व शक्यता अशक्य आहेत.

सेमीफायनलमधील संघ

Loading...

वर्ल्ड कपमधील सेमीफायनलचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. त्यानंतर बांगलादेशचा पराभव करत भारताने अंतिम चार संघात स्थान पक्क केले. मग यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत सेमीफायनमध्ये तिसरे स्थान मिळवले. न्यूझीलंडचे सेमीफायनलचे तिकिट जवळ जवळ निश्चित आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात काही चमत्कार केला तर न्यूझीलंड स्पर्धेबाहेर पडले. पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली आहे.

VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडचा धबधब्याचा असा झाला जलप्रपात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...