मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज गुरुवारी सेमीफायनलचा पहिला सामना पारपडणार आहे. यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून सामना सुरु होण्यापूर्वी दोन संघांमध्ये टॉस करण्यात आला. यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.