सिडनी, 03 मार्च : ऑस्ट्रेलियात महिला टी20 वर्ल्ड कप सुरु आहे. सेमीफायनलचे चार संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील पहिला सेमीफायनलचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 5 मार्चला सिडनीत हा सामना होईल. तर दुसऱा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गुरुवारी सिडनीमध्ये होणार आहे. या सामन्यानंतर दुसऱा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. गुरुवारी होणाऱ्या सामन्यात पाऊस झाला तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल. भारत ग्रुप स्टेजमध्ये सर्व सामने जिंकून टॉपमध्ये होते. जर पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचेल. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो.
सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागानुसार सिडनीत पावसाची दाट शक्यता आहे. सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला हा पाऊस वरदान ठरू शकतो तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो.
हे वाचा :
क्रिकेटचं किट खरेदीसाठी नव्हते पैसे, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या मुलीचे वडील विकतात दूध
पाऊस पडल्याने सेमीफायनल रद्द झाल्यास भारतीय संघाला फायदा मिळेल. याचे कारण भारताने ग्रुप स्टेजमध्ये केलेली कामगिरी ठरणार आहे. भारताने ग्रुप स्टेजमध्ये चारही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी कप दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत रोमहर्षक झाली होती. यामध्ये भारताने 3 धावांनी निसटता विजय मिळवला होता. शेवटच्या सामन्यात लंकेला 7 गडी राखून धूळ चारली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनंसुद्धा एकही सामना गमावला नाही. त्यामुळे त्यांनाही सेमीफायनलमध्ये सामना रद्द झाल्यास फायदा होईल.
हे वाचा : हार्दिक पांड्याचं तुफान! गोलंदाजांची धुलाई करत झळकावलं वेगवान शतक मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.