मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's world cup : टीम इंडियाची सर्वात मोठी शक्तीच ठरतेय डोकेदुखी, काय करणार मॅनेजमेंट उपाय?

Women's world cup : टीम इंडियाची सर्वात मोठी शक्तीच ठरतेय डोकेदुखी, काय करणार मॅनेजमेंट उपाय?

वर्ल्ड कप विजेतेपदाचं (Women's World Cup 2022) स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय टीम (Team India Women) न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत उतरली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची सर्वात मोठी शक्तीच डोकेदुखी ठरत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 मार्च : वर्ल्ड कप विजेतेपदाचं (Women's World Cup 2022) स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय टीम (Team India Women) न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत उतरली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची वाटचाल संमिश्र झाली आहे. भारतानं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा 107 रननं मोठा पराभव केला. त्यानंतर यजमान न्यूझीलंडकडून दुसऱ्या मॅचमध्ये टीमचा 62 रननं पराभव झाला. न्यूझीलंडनं दिलेलं 261 रनचं आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही.

शक्ती बनली डोकेदुखी!

भारतीय टीमनं वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड विरूद्ध वन-डे सीरिज (India women vs New Zealand Women) वन-डे सीरिज खेळली होती. त्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 1-4 असा पराभव झाला होता. पण, संपूर्ण सीरिजमध्ये भारतीय टीमनं सातत्यपूर्ण बॅटींग केली होती. भारतीय टीमनं सीरिजमधील 3 मॅचमध्ये 270 पेक्षा जास्त रन केले. त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये 252 रनचं टार्गेट यशस्वीपणे पूर्ण केले होते.

भारतीय टीमची बॅटींग ही वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी शक्ती मानली जात होती. याच शक्तीनं टीमला स्पर्धेत दगा दिला आहे. पाकिस्तान विरूद्धही मिडल ऑर्डर अचानक कोसळल्यानं टीम अडचणीत सापडली होती. त्यावेळी पूजा वस्त्राकार आणि स्नेह राणा यांनी सातव्या विकेटसाठी झुंजार भागिदारी करत टीमवरील संकट दूर केले. न्यूझीलंड विरूद्ध तर भारतीय टीमला संपूर्ण 50 ओव्हर्स देखील खेळता आल्या नाहीत.

भारतीय बॅटर्सनी न्यूझीलंड विरूद्ध 152 बॉल निर्धाव खेळले. त्याचा मोठा फटका टीमवर बसला. कॅप्टन मिताली राजनं देखील बॅटर्सच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. 'न्यूझीलंड विरूद्ध टार्गेट पूर्ण करणे शक्य होते, असे आम्हाला वाटले होते. त्यासाठी टॉप ऑर्डरनं चांगली कामगिरी करणे आवश्यक होतो. पण, आमच्या ठराविक अंतरानं विकेट्स पडल्या. त्याचा टीमवर दबाव वाढला. मॅच शेवटपर्यंत नेईल असा एकही बॅटर आमच्या टीममध्ये नव्हता. बॉलिंग अनप्लेएबल होती, असा प्रकार नव्हता. आम्ही चांगला खेळ करू शकलो असतो. आमच्या बॅटर्सनी विशेषत: टॉप आणि मिडल ऑर्डरनं चांगला खेळ करण्याची गरज आहे. कारण अन्य टीम 250-260 रन करत आहेत, ' असे मितालीने स्पष्ट केले.

PAK vs AUS : कराचीत दिसला जडेजा! पाकिस्तानच्या नेट प्रॅक्टीसचा Video Viral

टीम इंडियानं न्यूझीलंड विरूद्धच्या मॅचमध्ये शफाली वर्माला (Shafali Verma) बाहेर बसवले होते. टॉप ऑर्डरमध्ये आक्रमक खेळाडूची गरज असल्यानं वेस्ट इंडिज विरूद्ध शफाली खेळणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. वेस्ट इंडिजची टीम या स्पर्धेत चांगलीच फॉर्मात आहे. त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच अद्याप गमावलेली नाही. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या मॅचमध्ये कॅप्टन मिताली राजसह सर्वच भारतीय बॅटर्सना कामगिरी उंचावण्याचं आव्हान आहे.

First published:

Tags: Cricket news, Indian women's team, Mithali raj, Team india, World cup india