पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील रावळपिंडीमध्ये झालेली टेस्ट ड्रॉ झाली. ऑस्ट्रेलियाची टीम तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सीरिजसाठी आली आहे. या सीरिजमधील पहिल्याच टेस्टमधील पिचवर आयसीसीनं ठपका ठेवला आहे.रावळपिंडी टेस्टसाठी वापरण्यात आलेले पिच सरासरीपेक्षा खराब होते, असं मत आयसीसीनं व्यक्त केलं आहे. तसंच या पिचला एक डिमेरीट पॉईंट देखील दिला आहे. आयसीसीच्या नियमानुसार 5 वर्षांमध्ये कोणत्याही पिचला 5 डिमेरिट पॉईंट मिळाले तर त्या पिचवर 12 महिन्यांची बंदी घातली जाते. बंदीच्या कालावधीमध्ये तिथं कोणताही आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येत नाही. IND vs SL सीरिजनंतर टीम इंडियात होणार मोठा बदल, द्रविडच्या सल्ल्यानंतर BCCI चा निर्णय रावळपिंडी टेस्टमधील मॅच रेफ्री रंजन मदुगले (Ranjan Madugalle) यांनी ही कारवाई केली आहे. आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये त्यांचा समावेश आहे. मदुगले यांनी सांगितलं की, '5 दिवसांतच्या खेळामध्ये पिचमध्ये क्वचितच बदल झाला. फक्त थोडा बाऊन्स कमी झाला होता. या पिचवर फास्ट बॉलर्सना जास्त मदत मिळाली नाही. तसंच स्पिनर्सससाठीही काही खास नव्हतं. माझ्या मते रावळपिंडीच्या पिचवर बॅट आणि बॉलमध्ये समान स्पर्धा दिसली नाही. त्यामुळे आयसीसीच्या नियमांच्या आधारे या पिचला सरासरीपेक्षा कमी पॉईंट देत आहे' असे त्यांनी स्पष्ट केले.There’s a lot of Ravindra Jadeja, just a few inches taller, about Shaheen Shah Afridi bowling left-arm spin, the bounce in the hair included #PakvAus pic.twitter.com/6YCI99E9VV
— Bharat Sundaresan (@beastieboy07) March 10, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan, Ravindra jadeja, Video viral