Home /News /sport /

Women World Cup :73 ची सरासरी असणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात जागा नाही, हताश होऊन म्हणाली...

Women World Cup :73 ची सरासरी असणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात जागा नाही, हताश होऊन म्हणाली...

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कपसाठी (ICC Women World Cup 2022) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममधून अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

    मुंबई, 7 जानेवारी : न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कपसाठी (ICC Women World Cup 2022) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. अनुभवी खेळाडू मिताली राज (Mithali Raj) या टीमची कॅप्टन आहे. भारतीय महिला टीम (Indian Women Cricket Team) या वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध वन-डे मालिका देखील खेळणार आहे. या टीममधून अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये अनुभवी बॅटर पूनम राऊत (Punam Raut) हे प्रमुख नाव आहे. पूनमनं टीमममधून वगळल्यानंतर ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे. टीममधील अनुभवी खेळाडू आणि गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करूनही वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्यानं तिने निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या ट्विटमध्ये तिने गेल्या वर्षभरातील कामगिरीची आकडेवारी देखील दिली आहे. पूनम राऊतनं 2021 मधील तिच्या कामगिरीची आकडेवारी दिली आहे. यानुसार तिने 6 वन-डेमध्ये 73.75 च्या सरासरीने 295 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. सहापैकी तीन इनिंगमध्ये पूनमनं 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. त्यानंतरही टीममध्ये निवड न झाल्याने ती निराश झाली. तरीही तिनं यावेळी टीम इंडियात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महिला वर्ल्ड कपमधील भारताची पहिली मॅच 6 मार्च रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 8 टीम सहभागी होणार असून सर्व टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेची फायनल 3 एप्रिल रोजी होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 5 वन-डे सामने खेळणार आहे. 11 ते 24 फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्येच ही मालिका होईल. Ashes : इंग्लंडचा फ्लॉप शो कायम, चौथ्या टेस्टमध्येही गडगडली टॉप ऑर्डर वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी महिला टीम : मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर (व्हाईस कॅप्टन), स्मृती मंधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंह, रेणूका सिंह ठाकूर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव. राखीव  खेळाडू : सब्बीनेनी मेघना, एकता बिष्ट आणि सिमरन दिल बहादूर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या