Home /News /sport /

Ashes : इंग्लंडचा फ्लॉप शो कायम, चौथ्या टेस्टमध्येही गडगडली टॉप ऑर्डर

Ashes : इंग्लंडचा फ्लॉप शो कायम, चौथ्या टेस्टमध्येही गडगडली टॉप ऑर्डर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सिडनीमध्ये अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची अवस्था नाजूक आहे.

    सिडनी, 7 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सिडनीमध्ये अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची अवस्था नाजूक आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 8 आऊट 416 रनवर घोषित केली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी बिनबाद 13 रन काढले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टॉप ऑर्डर कोसळली. पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडनं 4 विकेट्स गमावल्या. सर्वात प्रथम मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) हसीब हमीदला 4 रनवर आऊट केले. त्यानंतर मेलबर्न टेस्टचा हिरो स्कॉट बोलंडनं एका अप्रतिम बॉलवर झॅक क्राऊलीची दांडी उडवली. बोलंडनंच इंग्लंडला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का दिला. त्याने इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) शून्यावर आऊट केले.  रूटनं 2021 मध्ये सर्वात जास्त रन केले होते. पण, त्याची 2022 ची सुरूवात निराशाजनक झाली आहे. कॅमेरून ग्रीननं डेव्हिड मलानला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यामुळे लंचपर्यंत इंग्लंडची अवस्था 4 आऊट 36 अशी झाली. इंग्लिश टीमसमोर आता फॉलोऑन वाचवण्याचे आव्हान आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 217 रन करावे लागतील. दोन्ही टीमचा सध्याचा फॉर्म पाहता हे रन करणे आव्हानात्मक आहे. यापूर्वी उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 8 आऊट 416 रनवर घोषित केली. दोन वर्षांनी टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या ख्वाजाने गुरूवारी टेस्ट क्रिकेटमधील नववे शतक झळकावले.  ख्वाजानं 137 रन काढले. तर स्मिथनं 67 रनची खेळी केली. ख्वाजानं सर्व बॅटर आऊट झाल्यानंतर बॉलर्सच्या मदतीने संघर्ष करत ऑस्ट्रेलियाला 400 रनचा टप्पा ओलांडून दिला. या टेस्टचा पहिला दिवसाचा काही खेळ पावसामुळे वाया गेला होता. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. World Test Championship: दक्षिण आफ्रिकेची पॉईंट टेबलमध्ये झेप, पाहा टीम इंडियाचा कितवा नंबर या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात टाकली आहे. ऑस्ट्रेलियानं या सीरिजमधील पहिली टेस्ट 9 विकेट्सनं, दुसरी 275 रनने आणि तिसरी एक इनिंग आणि 14 रनने जिंकली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashes, Australia, Cricket, England

    पुढील बातम्या