जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final 2023 : काय आहे सॉफ्ट सिग्नल रूल? WTC फायनलपासून होणार रद्द

WTC Final 2023 : काय आहे सॉफ्ट सिग्नल रूल? WTC फायनलपासून होणार रद्द

सॉफ्ट सिग्नल रूल होणार रद्द

सॉफ्ट सिग्नल रूल होणार रद्द

सॉफ्ट सिग्नल रूल हा क्रिकेटमध्ये नेहमीच वादात राहिला आहे. याबाबत दिग्गजांनीही प्रश्न उपस्थित करताना हा नियम रद्द करावा अशी मागणी केली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अवघ्या काही आठवड्यांवर आला असताना क्रिकेटमधील एक नियम रद्द केला जाणार आहे. आयसीसीने याबाबतचा नियम घेतला असून लवकरच हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात वापरणं बंद केला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्यापासून नियम हद्दपार होणार आहे. सॉफ्ट सिग्नल रद्द केला जाणार असून याचा निर्णय सौरव गांगुली आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असताना घेतला गेल्याचं म्हटलं जातंय. या निर्णयाची माहिती भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना देण्यात आली असल्याचं वृत्त क्रिकबझने म्हटलंय. IPL2023 धोनी घेणार निवृत्ती? तुफान बॅटिंग आणि या 3 गोष्टी देतात संकेत सॉफ्ट सिग्नल रूल हा क्रिकेटमध्ये नेहमीच वादात राहिला आहे. याबाबत दिग्गजांनीही प्रश्न उपस्थित करताना हा नियम रद्द करावा अशी मागणी केली होती. सॉफ्ट सिग्नल नियम रद्द केला पाहिजे आणि त्याचा निर्णय मैदानातल्या पंचांनी घ्यायला हवा. इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सनेही याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेनला सॉफ्ट सिग्नल म्हणून बाद देण्यात आलं होतं. त्याचा स्लिपमध्ये घेतलेला झेल संशयास्पद वाटत होता. पण जेव्हा पंचांना एखादी विकेट वादग्रस्त वाटते तेव्हा ती थर्ड अंपायरकडे का पाठवली जात नाही असं विचारलं जाऊ लागलं. याच सॉफ्ट सिग्नल नियमाचा इंग्लंडला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फायदा झाला होता. पाकचा फलंदाज सौद शकीलला सॉफ्ट सिग्नल म्हणून बाद दिलं होतं. IPL 2023 CSK vs KKR : सुनील गावसकरांनी घेतला MS Dhoni चा ऑटोग्राफ, मैदानावर नेमकं काय घडलं? काय आहे सॉफ्ट सिग्नल रूल? थर्ड अंपायर जेव्हा एखाद्या विकेटबाबत अचून निर्णय घेऊ शकत नाहीत तेव्हा सॉफ्ट सिग्नल म्हणून बाद दिलं जातं. एखादा झेल किंवा कोणताही कठीण निर्णय फिल्ड अंपायरकडून थर्ड अंपायरकडे पाठवण्यात येतो. तेव्हा सर्व तंत्रज्ञान वापरूनही टीव्ही अंपायरना याबाबत स्पष्ट निर्णय देता येत नसल्यास मैदानावरील पंचांचे मत घेतले जाते आणि तोच निर्णय कायम ठेवला जातो. या नियमात फिल्ड अंपायरने जवळून ती स्थिती पाहिल्याचं मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात