मुंबई : यंदाच्या आयपीएलमधील सामने अटीतटीचे आणि खूप चुरशीचे सुरू आहेत. मात्र ट्रॉफी कोण जिंकणार यापेक्षा सर्वात जास्त चर्चेचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे MS Dhoni निवृत्ती घेणार की नाही हाा आहे. सोशल मीडिया असो किंवा मित्र-मैत्रिणींचा ग्रूप सगळीकडे चर्चा एकच सुरू आहे. महेंद्रसिंह धोनी यंदा शेवटचं आयपीएल खेळणार का? महेंद्रसिंह धोनी चा चाहत्या वर्ग किती आहे याची पुन्हा एकदा प्रचिती पाहायला मिळाली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात धोनीच्या नावाचा जयघोष पाहायला मिळाला. अखेर धोनीला त्याच्या माईकचा आवाज वाढवावा लागला. त्याने सामना संपल्यावर प्रेक्षकांचे मनापासून आभारही मानले.
IPL 2023 CSK vs KKR : सुनील गावसकरांनी घेतला MS Dhoni चा ऑटोग्राफ, मैदानावर नेमकं काय घडलं?संपूर्ण देश धोनीचा फॅन आहेच पण चक्क सामना संपल्यानंतर सुनील गावस्कर मैदानात उतरले आणि त्यांनी शर्ट आणि माइकवर धोनीची सही घेतली. त्यामुळे अनेकांनी हा फेअरवेल सामना होता का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
𝙔𝙚𝙡𝙡𝙤𝙫𝙚! 💛
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
A special lap of honour filled with memorable moments ft. @msdhoni & Co. and the ever-so-energetic Chepauk crowd 🤗#TATAIPL | #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/yHntEpuHNg
महेंद्रसिंह धोनीने असे तीन संकेत दिले आहेत ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यंदा धोनी शेवटचं आयपीएल खेळणार अशी चर्चा रंगली आहे. आता हे तीन संकेत नेमके काय आहेत जाणून घेऊया. एमएस धोनी ज्या स्टेडियममध्ये मॅच खेळणार होता तिथे यावर्षी प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील सामन्यानंतर त्याने स्वतः सांगितले की चाहते त्याला निरोप देण्यासाठी आले होते. खुद्द माहीने पुढच्या सीझनमध्ये उतरण्याबाबत काहीही सांगितलेले नाही. धोनी कोणालाही पूर्व कल्पना न देता अचानक निर्णय घेतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.
IPL 2023 : MS Dhoni ची मैदानातली अशी अवस्था, चाहते पडले चिंतेत, मैदानातला VideoCSK ने महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सगळ्यांना भेटत असल्याचंही दिसत आहे. त्यामुळे यावेळी धोनी शेवटचं आयपीएल खेळत असल्याचंही दिसत आहे.
रविवारी झालेल्या सामन्यानंतर सुनील गावसकर ज्या पद्धतीने मैदानात वागले त्यावरून चाहत्यांना कुणकुण लागली आहे. ज्या पद्धतीने सुनील गावस्कर मैदानात उतरले आणि धोनीला मिठी मारली, त्याने माहीच्या निवृत्तीच्या चर्चेला अधिक हवा मिळाली.