चेन्नई, 15 मे : आयपीएल 2023 मधील 61 वा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पारपडला. या सामन्यात केकेआरने चेन्नई सुपरकिंग्सला त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभवाचा धक्का दिला. परंतु यानंतर मैदानावर जे घडलं त्याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. सामना संपल्यानंतर भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी धोनीचा ऑटोग्राफ घेतला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 मधील शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळत होते. अशा परिस्थितीत सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी चाहत्यांसोबत मैदानात फेऱ्या मारत होता. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना माही सीएसकेच्या जर्सी आणि इतर भेटवस्तू देत होता. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकरही तेथे पोहोचले. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या हातात पेन दिला आणि माहीला आपल्या शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली.
MS Dhoni signing in the shirt of Sunil Gavaskar.
— Johns. (@CricCrazyJohns) May 14, 2023
Video of the day 👌https://t.co/Zio2BKkn1c
आयपीएल 2023 मध्ये कॉमेंट्री करणारे सुनील गावस्कर या मॅचच्या वेळी चेन्नईतच उपस्थित होते. अशा स्थितीत भारताच्या या दिग्गज फलंदाजाने आपल्या ज्युनियर महेंद्रसिंग धोनीला ऑटोग्राफ मागणे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. धोनीला क्षणभर आश्चर्य वाटले पण त्याने गावसकरांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या कपड्यांवर ऑटोग्राफ दिला. सुनील गावसकरांनी यापूर्वी अनेकदा एम एस धोनीच्या खेळीचे त्याच्यातील नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. सध्या या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.