दुबई, 03 फेब्रुवारी : भारताने न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक टी20 मालिका विजय साजरा केली. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर 5-0 ने लोळवलं. भारताने मालिका जिंकली असली तरी संघाला सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के रकमेइतका दंड आयसीसीने केला आहे. संथगतीने षटके टाकल्याप्रकरणी आयसीसीने ही कारवाई केली आहे. पाचव्या सामन्यात निर्धारीत वेळेत एक षटक कमी टाकल्याने टीम इंडियाला दंड करण्यात आला आहे.
आयसीसीने म्हटलं की, कलम क्रमांक 2.22 नुसार निर्धारीत वेळेत षटके पूर्ण न केल्यानं टीम इंडियावर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल. विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. संथ गतीने षटके टाकल्याचा मॅच रेफरींनी केलेला आरोप रोहित शर्माने मान्य केला आहे. त्यामुळे यावर वेगळी सुनावणी घेण्याची गरज नसल्याचंही आयसीसीने नमूद केलं आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा सामना 7 धावांनी जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकासुद्धा 5-0 अशी जिंकली. टी20 मालिकेत 5-0 अशा फरकाने विजय मिळवणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.
क्रिकेटपटूने लाज सोडली! फिटनेस टेस्ट नापास झाल्याने काढले सगळे कपडे
सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाला संथ गतीने षटके टाकल्याबद्दल दंड झाला आहे. चौथ्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकली होती. त्याबद्दल सामन्याच्या मानधनाच्या 40 टक्के रकमेचा दंड टीम इंडियाला करण्यात आला होता.
भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतूनही बाहेर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.