लंडन, 21 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व संघाचे लीग स्टेजमधले सामने संपत आल्यामुळं सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व संघानी आपले पाच सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशला नमवल्यानंतर कमकुवत संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळं हे संघ सेमीफायनलसाठी फिक्स झाले आहेत. सध्या गुणतालिकेत एक नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारत हे चार संघ सेमीफायनल गाठू शकतात. न्यूझीलंड आणि भारत यांनी एकही सामना गमावलेला नाही तर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी एका सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. मात्र, सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजींच्या यादीत एकही गोलंदाज नाही आहे. सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क 15 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तानचा मोहम्मद आमिर 13 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा एकमेव फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल 6 विकेसह 16व्या स्थानावर आहे.
तर, दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताकडून रोहित शर्मा 319 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. यात डेव्डिड वॉर्नर 447 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, बांगलादेशचा शाकिब 425 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
9 आणि 11 जुलैला होणार सेमीफायनल वर्ल्ड कपमध्ये सध्या लीग स्टेजचे सामने सुरु आहेत. त्यानंतर 9 जुलैपासून नॉक आऊट सामने सुरु होती. पहिला सेमीफायनल सामना 9 जुलैला मॅंचेस्टरमध्ये होईल तर दुसरा सामना 11 जुलैला बर्मिंघममध्ये होईल. अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉर्डसवर होणार आहे. भारताचा प्रवास सोपा भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळं रद्द झाला त्यामुळं भारताकडे आता 7 गुण आहेत. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवलं आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावासामुळं रद्द झाला. त्यामुळं भारतानं आता बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल वाचा- …म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला सानियासाठी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

)







