
विश्वचषकात दमदार कामगिरीद्वारे आपली छाप पाडणारा भारतीय संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. विराटसेना जेवढी मैदानावर चर्चेत असते, तेवढीच सध्या मैदानाबाहेरही चर्चेत आहे. यात आता हेअरस्टाईलमध्येही विराटसेना आघाडीवर आहे.

बीसीसीआयनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, यजुर्वेद्र चहल आणि महेंद्रसिंह धोनी यांचे यंदाच्या विश्वचषकातील नव्या हेअरस्टाईलचे फोटो व्हायरल झाले आहेत.

यात नेहमी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईलही चांगलीच गाजत आहे. आलिम हाकिम या सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्टनं हे फोटो शेअर केले आहेत.

तर, सोशल मीडियावर कोहली व चहलच्या हेअरस्टाईलला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मात्र, धोनी सर्वामध्ये उठावदार दिसत आहे.

नेहमीच आपल्या लाविश लाईफमुळं ओळखला जाणारा हार्दिक पांड्या आपल्या हेअरस्टाईलनंही चर्चेत आला आहे. तर, पांड्याच्या मानेखाली काढलेल्या टॅटूबाबतही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.

भारतीय संघ अफगाणिस्तान विरोधात आपला पुढचा सामना खेळणार आहे. मात्र सध्यातरी त्यांच्या या नव्या लुकची चर्चा आहे.




