लंडन, 21 जून : ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानी संघाचे आव्हान आता जवळजवळ संपुष्टात आले आहे. पाकिस्तान संघानं आतापर्यंत केवळ एक सामना जिंकला आहे, त्यामुळं गुणतालिकेत ते 9व्या क्रमांकावर आहेत. यातच, पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हफीजसह एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळं चाहत्यांनी संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जर, पाकला सेमीफायनलपर्यंत मजल मारायची असेल तर, त्यांना सर्व सामने चांगल्या रनरेटनं जिंकावे लागणार आहेत.
1992मध्ये वर्ल्ड कप जिंकणारा पाकिस्तानी संघ यावेळी सहा सामन्यानंतरच स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. पाककडे आता फक्त चार सामने आहेत. त्यांचा पुढचा सामना वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हफिजनं पाकिस्तान खेळाडू पुन्हा जोमानं खेळतील अशी आशा व्यक्त करत, "गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ सध्या 9व्या स्थानावर आहे. जे फार दु:खादायक आहे", असे सांगितले. पाकिस्तान संघानं इंग्लंडविरोधात आपला पहिला सामना जिंकला. मात्र भारताविरुद्ध मिळालेला पराभव पाक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.
यातच भारताविरुध्द झालेल्या सामन्यात पाक कर्णधार सर्फराजनं घेतलेले निर्णय चूकीचे असल्याची टीक पाक मीडियानं केली होती. यावर हाफिजनं, "एका व्यक्तीला दोषी ठरवणे चूकीचे आहे. पराभवाची जबाबदारी संपूर्ण संघाची आहे. मीडियानं आमची केलेली बदनामी दु:खादायक आहे", असे सांगितले.
भारताविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय हा संघाचा
पाकिस्तानच्या पराभवाला चाहत्यांनी सर्फराजला कारणीभूत ठरवले आहे. सर्फराजनं नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय संघाला महागात पडल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर, पाकिस्तानचे पूर्व कर्णधार आणि पंतप्रधान इमरान खान यांनी, सामन्याआधीच सर्फराजला टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सर्फराजनं पंतप्रधानांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका संपूर्ण संघाला बसला, अशी टीका सर्वत्र होत असताना हाफिजनं त्याची बाजू घेतली. हाफिजनं, "गोलंदाजीचा निर्णय हा संपूर्ण संघाचा होता. कोणाच्याही ट्विटवरून आम्ही आमचा निर्णय घेऊ शकत नाही. पीच पाहून निर्णय घेतला जातो, असे सांगितले.
वाचा- World Cup : 'काहीच मदत मिळत नाही', इंग्लंड आणि ICC वर बुमराह भडकला!
वाचा- World Cup 2019 : 400 धावा करणारा वॉर्नर पहिला फलंदाज, केली विराटची बरोबरी!
वाचा- World Cup : कांगारूची पहिल्या स्थानावर उडी, जाणून घ्या भारत कोणत्या नंबरवर?
सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं