जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : भारताच्या पराभवानंतर पाकला झोंबल्या मिरच्या, वकार बरळला

World Cup : भारताच्या पराभवानंतर पाकला झोंबल्या मिरच्या, वकार बरळला

World Cup : भारताच्या पराभवानंतर पाकला झोंबल्या मिरच्या, वकार बरळला

इंग्लंडकडून भारताला पराभव मिळाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी विराटसेनेवर टिका करण्यास सुरुवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बर्मिंगहम, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला. भारतानं सलग 5 सामन्यात विजय मिळवलेल्या विराटसेनेला इंग्लंडनं ब्रेक लावला. त्यामुळं इंग्लंडने सेमीफायनलच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. मात्र, भारताच्या विजयावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे भवितव्य अवलंबून होते. गुणतालिकेत सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. तर, पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे. त्यामुळं पाकिस्तानला सेमिफायलनमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भारताच्या विजयाची अपेक्षा होती. इंग्लंडनं केलेला भारताचा पराभव पाकिस्तानी चाहत्यांना सहन होत नसल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे. याआधी पाकच्या चाहत्यांनी विराटसेनेला ऑक्सरला द्या, अशी टीका केली होती. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूस यानं भारतीय संघावर टिका केली आहे. युनूसनं इंग्लंडनं विराटसेनेला पराभवाचा दणका दिल्यानंतर भारताच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केला आहे. याआधी पाकिस्तानचा वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांने भारताच्या पराभवानंतर टिका केली होती. भारताच्या पराभवामुळं पाकिस्तानला आता न्यूझीलंडवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर आपले दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी बांगलादेश विरोधात होणारा सामना जिंकणे बंधनकारक असणार आहे. मात्र मंगळवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामनाही पाकिस्तानसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. वकार युनूसनं काढला भारतावर राग भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाक चाहते भारताला समर्थन देत होते. कारण भारतानं हा सामना जिंकला असता तर पाकच्या सेमीफायनल गाठण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. मात्र, इंग्लंडनं दिलेल्या 337 धावांचे आव्हान भारताला पार करता आले नाही. भारतानं केवळ 308 पर्यंत मजल मारली. यावर पाकिस्तानचा पूर्व प्रशिक्षक आणि कर्णधार वकार यूनुसनं ट्विटरवर, “तुम्ही कोन आहात, हे महत्त्वाचे नसते. पण तुम्ही आयुष्यात काय करता, यावरून कळते की तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात. मला पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचेल की नाही याची चिंता नाही. पण एका चॅम्पियन संघाची परीक्षा होती पण त्यात सफल झाले नाहीत”, असे म्हणतं टिका केली.

जाहिरात

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचे वादळ तर भारत शांत इंग्लंडनं आपल्या शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 92 धावा केल्या. दरम्यान त्यांनी 4 विकेटही गमावल्या. तर, भारतानं आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जॉस बटलरनं आक्रमक फलंदाजी करत 5 षटकार लगावले. मात्र, भारताकडून महेंद्रसिंग धोनीनं केवळ 1 षटकार लगावला. धोनी आणि पांड्या आक्रमक फलंदाजी करत असतानाच पांड्यांच्या विकेटनंतर भाराताच्या हातातून सामना निसटला. वाचा- ‘तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग’; रोहितनं केली बोलती बंद वाचा- World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास; अर्धशतकी खेळीने कर्णधारांमध्ये झाला बाप! वाचा- World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात