ICC Cricket World Cupcमध्ये 16 जूनला वर्ल्ड कपमधला सर्वात मोठा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅंचेस्टरच्या मैदानावर हा हायवोल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी, चाहत्यांची नजर या सामन्यावर आहे.
दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं या सामन्यात ते विजयासाठी धडपडत आहेत. यासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिस त्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्यानं भारताला पराभूत करण्यासाठीचा एक मंत्र पाकिस्तान संघाला सांगितला आहे.
वकार युनिसनच्या मते, पाकिस्तानच्या संघानं ज्या प्रकारची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाविरोधात केली तशीच त्यांनी भारताविरोधात केली तर त्याचा फटका त्यांना बसू शकतो. याचसंदर्भात युनिसनं पाकिस्तानचा जलद गोलंदाज मोहम्मद आमिर याला मार्गदर्शन केले.
पाकिस्तानच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांना लवकर बाद करता आले नाही. परिणामी त्यांनी 300चा आकडा पारा केला. त्यामुळं भारताविरोधात सलामीची जोडी फोडणे पाकिस्तानला गरजेचे आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतचं नेहमी वरचढ राहिला आहे. त्यामुळं जर पाकिस्तानला सामना जिंकायचा असेल तर, विराटसेने विरोधात त्यांना चांगली रणनीती वापरावी लागेल.
ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. हवामानानुसार मॅंचेस्टरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता, पावसाची शक्यता 50 % आहे. मॅंचेस्टरमध्ये सकाळपासून-संध्याकाळपर्यंत पाऊस वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चाहत्यांना मोठा फटका बसू शकतो.