World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका

World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका

याआधी शोएबनं असा अनफीट कर्णधार कधीच पाहिला नसल्याचं म्हणत, सर्फराजच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले होते.

  • Share this:

मॅंचेस्टर, 17 जून : ICC World Cup 2019मध्ये भारतानं पाकिस्तानला नमवतं, आपली विजयी घौडदौड सुरु ठेवली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान यानं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पाकिस्तानला महागात पडला कारण पहिल्या विकेटसाठी रोहत शर्मा आणि केएल राहुल यांनी तब्बल 136 धावांची भागिदारी केली. यात दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळं पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर तबाव टाकता आला नाही. त्यातच ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळं तब्बल तीनवेळा रनआऊटची संधी हुकली. त्यामुळं भारतीय संघानं 336 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजांना हे आव्हान पार करता आले नाही

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या या सगळ्या स्थितीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर यानं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान याला जबाबदार ठरवले आहे. शोएरबनं आपल्या यु-ट्युब चॅनलवरुन भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केलं आहे. शोएबच्या मते पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतले पाहिजे होता. त्यानं, भारतीय संघाविरोधात पाकिस्तानच्या संघानं एवढ्या वर्षात कधी आव्हानाचा पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळं सफराजनं आपलं डोक चालवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली.

शोएबनं या व्हिडिओमध्ये, "आमची मॅनेजमेंट पागल आहे आणि आमचा कर्णधार मामू बनला आहे. त्याला काही कळत नाही. तो म्हणजे 10वीच्या वर्गातला मुलगा आहे, त्याला बाकी जे सांगतील तेवढेचं तो करतो'', अशी जहरी टीका केली आहे.

यातच भारताची फलंदाजी सुरु असताना सर्फराज स्वत:च संघ सहकाऱ्यांना दिलेल्या सूचना विसरला. सामन्यात पाकच्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाज तुटून पडले होते. गोलंदाजांची केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी झोप उडवली असताना यष्टीमागे उभा असलेला पाकचा कर्णधार सर्फराज अहमद मात्र जांभई देत असलेला बघायला मिळाला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सर्फराज अहमदवर जोरदार टीका केली होती. त्याने असा अनफीट कर्णधार कधीच पाहिला नसल्याचं म्हणत प्रश्न उपस्थित केले होते.

तसेच पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न आता भंगले आहे. पाकिस्तान संघानं आतापर्यंत केवळ एक सामना जिंकला आहे, तर एक सामना रद्द झाला आहे. तीन सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यामुळं पाकिस्तान संघाचे सेमीफायनलचे आव्हान संपुष्टात आले आहे.

वाचा- इंग्लंडचा खेळाडू विराटला म्हणाला, 'तुझ्यामुळे डिलीट करावं लागेल ट्विटर अकाउंट'

वाचा- विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी

वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन!

वाचा- World Cup : ....तरच मी पाकिस्तानच्या फलंदाजांना सल्ला देणार, रोहितचा क्लिन स्वीप

VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा

First published: June 17, 2019, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading