लंडन, 17 जून : ICC Cricket World Cup 2019मध्ये भारतीय संघ सध्या चांगल्याच जोमात आहे. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला तब्बल 89 धावांनी नमवत विराट सेनेने आपली विजयी परंपरा कायम राखली. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी पाजले आहे. भारतीय संघाने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. पावसामुळे हा खेळ केवळ 40 षटकांचा झाला. यातही भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल 89 धावांनी विजय मिळवला. यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ सध्या 7 गुणसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यांनं आरोप केले आहेत. त्यानं ट्विट करत आपल्याला, विराटमुळं आपल्याला का ट्विटर अकाउंट डिलीट करावेसे वाटत आहे हे सांगितले. खरतर काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट बेन स्टोक्सच्या नावाचा उल्लेख करत आहेत. यावरून नेटेकरांनी बेनलाच ट्रोल केले. यामुळे बेनला आपले ट्विटर अकाउंट डिलीट करावेसे वाटत होते. त्याने, “मी माझे ट्विटरच डिलीट करतो, म्हणजे मग कोणी असं म्हणणार नाही की कोहली माझ्या नावाचा उच्चर करतो. पण तो असे करतच नाही आहे हे सुद्धा कळत आहे, हे सगळं खूप मजेशीर आहे, असे मिश्किल ट्विट केले आहे.
😂“I feel so proud when india takes a wicket because each time they take a wicket, Virat Kohli takes my name. You can find that out by reading his lips” - Ben Stokes pic.twitter.com/0a9uoe2yKc
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) June 12, 2019
क्रिकेट चाहत्यांचा भलताच दावा क्रिकेट चाहत्यांनी कोहली सामना सुरू असताना वा विकेट गेल्यानंतर अपशब्द वापरतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोहली अपशब्द नाही तर चक्क बेन स्टोक्सच नाव घेत आहे असा व्हिडिओ चाहत्यांनी व्हायरल केला. मात्र बेनन आता असे काही नाही आहे असे सांगत, विराटही मिश्किल असल्याचे सांगितले आहे. रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या