लंडन, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये आता प्रत्येक संघानं 4 सामने खेळले आहेत. त्यामुळं आता सर्व देश हे सेमीफायनल गाठण्यासाठी झगडत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रॉबीन राऊंड पध्दतीचा वापर होत असल्यामुळं प्रत्येक संघाचे 9 सामने होणार आहेत. यानंतर गुणातालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असलेले संघ सेमीफायनल गाठतील. त्यामुळं आता सेमीफायनल गाठणारे ते चार संघ कोणते असतील, याचे तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी 5 सामने खेळले आहेत. तर, न्यूझीलंड, भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान यांनी 4 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, भारताचा संघ 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 9 आणि 11 जुलैला होणार सेमीफायनल वर्ल्ड कपमध्ये सध्या लीग स्टेजचे सामने सुरु आहेत. त्यानंतर 9 जुलैपासून नॉक आऊट सामने सुरु होती. पहिला सेमीफायनल सामना 9 जुलैला मॅंचेस्टरमध्ये होईल तर दुसरा सामना 11 जुलैला बर्मिंघममध्ये होईल. अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉर्डसवर होणार आहे. या चार संघांना मिळणार सेमीफायनलचं तिकीट ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या चार क्रमांकात आहेत. त्यामुळं या चार संघांना सेमीफायनले तिकीट मिळू शकते.
.@BCBtigers climb up to 5th place in the #CWC19 standings following a resounding victory over @windiescricket #CricketWorldCup2019 pic.twitter.com/dJtMFODdZt
— News18 CricketNext (@cricketnext) June 17, 2019
भारताचा प्रवास सोपा भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळं रद्द झाला त्यामुळं भारताकडे आता 7 गुण आहेत. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवलं आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावासामुळं रद्द झाला. त्यामुळं भारतानं आता बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. वाचा- सानियानं काढला ‘ती’च्यावर राग म्हणाली, ‘मी पाकिस्तान संघाची आई नाही’ वाचा- पुन्हा बांगलादेशचा संघ ठरला जायंट किलर, वेस्ट इंडिज विरोधात केले ‘हे’ रेकॉर्ड वाचा- World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

)







