इस्लामाबाद, 07 जुलै : ICC Cricket World Cup मधून पाकिस्तानला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं. पाकिस्तानचा संघ रविवारी मायदेशी पोहचला यानंतर कर्णधार सर्फराज अहमदने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सर्फराजला भारत पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध हारला का असं विचारलं. तेव्हा सर्फराजनं भारताच्या हेतूवर शंका घेणं चुकीचं असल्याचं त्यानं सांगितलं. भारत इंग्लडविरुद्ध जाणीवपूर्वक पराभूत झाला म्हणता येणार नाही असेही सर्फराज म्हणाला. पाकिस्तानने 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंड आणि पाकचे समान गुण झाले होते. मात्र, धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने बाजी मारली. जर भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला असता तर पाकिस्तानला सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला असता. भारताच्या हेतुंवर शंका घेणं चुकीचं आहे. पाकिस्तानमुळं भारत हारला असं मला वाटत नाही. इंग्लंडने चांगली कामगिरी केली असं सर्फराजने पत्रकार परिषदेत सांगितलं. पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी भारत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी इंग्लंडविरुद्ध हारला असा आरोप केला होता. World Cup : ‘भाजपच्या दबावामुळे भारताने या खेळाडूला ठेवलं बाहेर’ पाकिस्तानच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर शोएब मलिकने निवृत्ती जाहीर केली. त्याबद्दल सर्फराज म्हणाला की, शोएब आमच्यातला सिनिअर खेळाडू आहे पण त्याच्यासाठी ही स्पर्धा चांगली राहिली नाही. त्याने देशासाठी खूप केलं आहे. त्याचं संघात असणं आमच्यासाठी चांगलं होतं. शोएब मलिकने फक्त एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेनंतर तो यातूनही निवृत्ती घेईल असं म्हटलं जात आहे. World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला ‘हा’ क्रिकेटर धोकादायक! 11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी? VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







