World Cup : 11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

World Cup : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 जुलैला सेमीफायनलची पहिली लढत होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 04:39 PM IST

World Cup : 11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

मँचेस्टर, 07 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये सेमीफायनलचे 4 संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेत पहिला सेमीफायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 जुलैला होणार आहे. या सामन्यामुळे पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आमने-सामने येणार आहे. दोघेही 11 वर्षांपूर्वी 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. तेव्हाही दोघे आपआपल्या देशाचं नेतृत्व करत होते.

2008 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलला पोहचले होते. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारताला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात विराटने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत 7 षटकांत 27 धावा देत 2 बळी घेतले होते. भारताने तेव्हा सेमीफायनलच नाही तर फायनलमध्ये आफ्रिकेला पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला होता.

सेमीफायनलच्या त्या सामन्यात पावसामुळे भारताला 43 षटकांत 191 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताकडून श्रीवत्स गोस्वामीने 51 आणि कोहलीने 43 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 9 चेंडू आणि 3 गडी राखून जिंकला होता. विराटच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

2008 मध्ये फक्त विराट आणि विल्यम्सन आमनेसामने नव्हते तर रविंद्र जडेजासुद्धा त्या संघात होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी अंडर 19 वर्ल्ड कप खेळत होता. आता 11 वर्षांनी हे खेळाडू पुन्हा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता पुन्हा विराट कोहली इतिहासाची पुनरावृत्ती करणार की न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन त्या पराभवाचा बदला घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताने साखळी फेरीत फक्त एक सामना गमावला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा तीन सामन्यात पराभव झाला आहे.

Loading...

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...