मॅंचेस्टर, 17 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला 89 धावांनी नमवले. आतापर्यंत सात वेळा भारतीय संघानं पाकिस्तानला पाणी पाजले आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणइ 2015 मध्ये 76 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यानंतर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही खेळाडूची किंवा सामन्याचा नाही तर ऋषभ पंत आणि झिवाचा. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तीन आठवडे तो खेळू शकत नाही आहे, म्हणून त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. मात्र आता वर्ल्ड कपमध्ये ऋषभ महेंद्रसिंग धोवीच्या लेकीला म्हणजेच झिवाला सांभाळायचं काम करत आहे. या दोघांचा व्हिडिओ ऋषभनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत झिवा आणि ऋषभ दोघंही एकमेकांकडे बघून जोर जोरात ओरडताना दिसत आहेत. हे चित्र पहिल्यांदाच दिसत आहे असे नाही, याआधी ऋषभ शिखर धवनचा मुलगा झोरावर यांची काळजी घेताना दिसत होता.
याआधी ऋषभ पंतनं झिवाकडून हिंदीचे धडे घेतले होते.
जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी बेबी सिटर बनला पंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांन मेलबर्नच्या कसोटी सामन्यात माझ्या मुलांना सांभाळशील का, असा टोला लगावला होता. त्यानंतर ऋषभ पंत पेनच्या मुलांना खरच सांभाळतांना दिसला होता. त्यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Tim Paine to @RishabPant777 at Boxing Day Test: "You babysit? I'll take the wife to the movies one night, you'll look after the kids?"
— ICC (@ICC) January 1, 2019
*Challenge accepted!* 👶
(📸 Mrs Bonnie Paine) pic.twitter.com/QkMg4DCyDT
पंतनं टिमवर केला होता पलटवार टिमच्या या अपरोधिक टिकेनंतर पंतनं मैदानावर ऑस्ट्रेलियाला सडकून उत्तर दिले होते. त्यावेळी पेनला बाद करत पंतनं आपला बदला घेतला. वाचा- इंग्लंडचा खेळाडू विराटला म्हणाला, ‘तुझ्यामुळे डिलीट करावं लागेल ट्विटर अकाउंट’ वाचा- विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन! वाचा- World Cup : ….तरच मी पाकिस्तानच्या फलंदाजांना सल्ला देणार, रोहितचा क्लिन स्वीप VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा