

आयपीएल गाजवल्यानंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे हे, विश्वचषकाकडे. दरम्यान आयपीएलच्या बाराव्या हंगामात विदेशी खेळाडूंची चलती होती. यात काही असे खेळाडूही होते, ज्यांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. यातले हे 10 विदेशी खेळाडू येत्या विश्वचषकात विराट सेनेची डोकेदुखी ठरु शकतात.


या यादीत पहिला क्रमांक लागतो तो, डेव्हिड वॉर्नर याचा. बॉल टेम्परिंगनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या वॉर्नरनं यंदाच्या हंगामात 143.86च्या स्ट्राईक रेटनं 692 धावा केल्या. यात एक शतक तर, 8 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान आता विश्वचषकात ऑस्ट्रेलियांकडून खेळणारा हा सलामीचा फलंदाज भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते.


साऊथ आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डी कॉकनं आयपीएलमध्या आपल्या खेळीनं सर्वांना चक्कीत केलं. मुंबईकडून खेळणाऱ्या या खेळाडूनं 14 सामन्यात 132.91च्या स्ट्राईक रेटनं 529 धावा केल्या. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा असला तरी, आता विश्वचषकात डी कॉक भारताच्या चिंता वाढवू शकतो.


आयपीएलमध्ये कोणाच्या नावाची चर्चा असेल तर तो आहे आंद्रे रसेल या वादळाची. रसेलनं चक्क 204.81च्या स्ट्राईकनं 510 धावा केल्या यात त्यानं चक्क 52 षटकार खेचले. त्यामुळं विश्वचषकात या वादळापासून विराटला सावध रहावे लागणार आहे.


रसेल बरोबर आणखी एक असं वादळ आहे, जे यंदाच्या हंगामत तेवढी चांगली कामगिरी करु शकला नसला तरी त्याची फलंदाजी गोलंदाजांची झोप उडवण्यासाठी खुप आहे. तो फलंदाज आहे, युनिवर्सल बॉस ख्रिस गेल. गेलनं 13 सामन्यात 153.60च्या स्ट्राईक रेटनं 490 धावा केल्या आहे.


आयपीएलमध्ये पदार्पणातच हा खेळाडू चर्चेचा विषय बनला, इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यांन हैदराबाद सोबत आयपीएलमध्ये 10 सामन्यात 157.24च्या सरासरीनं 445 धावा केल्या आहेत. त्यामुळं हा खेळाडू विश्वचषकातही अशीच फलंदाजी करणार यात काही वाद नाही.


चेन्नई सुपर किंग्ज संघानं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं नसलं तरी, त्यांच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. दरम्यान साऊथ आफ्रिकेचा फलंदाज ड्यु प्लेसिस यानं या हंगामात चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्या तीन अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईनं अंतिम सामना गाठला.


यंदाच्या हंगामात राजस्थान संघानं प्ले ऑफमध्ये आपली जागा मिळवली नसली तर, इंग्लंडच्या जॉस बटलरनं चांगली फलंदाजी केली. त्यानं 8 सामन्यात 311 धावा केल्या.


चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आघाडीचा गोलंदाज आणि पर्पल कॅपचा मानकरी इमरान ताहीर यानं यंदाच्या हंगामात आपल्या सेलिब्रेशन स्टाईलसह बॉलिंगनही गाजवलं. ताहीर 17 सामन्यात 26 विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे.


ताहीर बरोबरच साऊथ आफ्रिकेच्या आणखी एका युवा गोलंदाजानं आयपीएल गाजवलं. तो गोलंदाज म्हणजे कागिसो रबाडा. त्यानं या हंगामात 12 सामन्यात 25 विकेट घेतल्या आहे. पर्पल कॅपच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र दुखापतीमुळं त्याला माघार घ्यावी लागली.