जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : मैदानात झाड असेल तर पाक पोहचेल सेमीफायनलला!

World Cup : मैदानात झाड असेल तर पाक पोहचेल सेमीफायनलला!

World Cup : मैदानात झाड असेल तर पाक पोहचेल सेमीफायनलला!

ICC Cricket World Cup सेमीफायनलला पोहचायचं असेल तर मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल. त्यासाठीची समीकरणं पाकच्या आवाक्याबाहेरची आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यांचे 8 सामन्या 9 गुण झाले असून गुणतक्त्यात ते पाचव्या स्थानावर आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचे सर्व सामने झाले असून त्यांचे 11 गुण आहेत. पाकिस्तानला पुढचा सामना जिंकून 11 गुण मिळवता येतील पण धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडला मागे टाकणं अशक्य आहे. त्यासाठी त्यांना नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून बांगलादेशसमोर मोठं आव्हान उभा करावं लागेल. त्यानंतर बांगलादेशला ऑलआऊट करावं लागेल. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी लॉर्ड्सवर सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे जवळ जवळ निश्चित आहे. पाकचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक हारली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल. कारण एक बॉल एक धाव जरी काढली तरी पाक स्पर्धेतून बाहेर पडेल. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान समोर केवळ एकच मार्ग आहे आणि तो जवळ जवळ अशक्य आहे. या सामन्यात पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी 350 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकला बांगलादेशला 38 धावसंख्येवर ऑल आऊट करावे लागेल. पाकिस्तानने 400 धावा केल्या तर बांगलादेशचा डाव 84 धावांवर संपुष्टात आणावा लागेल.

जाहिरात

पाकला जास्तीजास्त धावा करण्यासाठी सोशल मिडियावर अनेक मजेशीर उपाय नेटकऱ्यांनी सुचवले आहेत. यात काहींनी एलियन बोलवून सर्व बॉलवर षटकार मारा म्हणजे बांगलादेशवर सहज विजय मिळवता येईल. याशिवाय एका युजरनं 1894 मधील एका घटनेचा उल्लेख करत त्याची पुनरावृत्ती झाल्यास पाकिस्तानला मोठं आव्हान उभा करता येईल असं म्हटलं आहे.

1894 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियात 15 जानेवारी 1894 मध्ये विक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने उंच फटका मारला. तो चेंडू थेट जाऊन झाडावर अडकला. चेंडू झाडावरून काढेपर्यंत फलंदाजांनी पळून 286 धावा काढल्या होत्या. दरम्यान चेंडू हरवला असं घोषित करावं अशी विनंती पंचांकडे करण्यात आली होती. मात्र, झाडावर अडकेला चेंडू दिसत असल्याचं सांगून पंचांनी ती विनंती फेटाळून लावली होती. विक्टोरियाच्या फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर 286 धावा करून डाव घोषित केला होता. एका चेंडूत 286 धावा हे मान्य करणं कठीण असलं तरी हे अशक्य नाही. क्रिकेटच्या नियमानुसार चेंडू सीमारेषेबाहेर जाण्याआधी खेळाडू कितीही धावा पळून काढू शकतात. या सामन्याचे वृत्तांकन तेव्हाचे इंग्रजी वृत्तपत्र पॉल मॉल गॅझेटमध्ये आलं होतं. त्यानंतर इंग्लंड, अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांमधून ही बातमी छापून आली होती. या सामन्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न झाल्यानं एका चेंडूत 286 धावांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होऊ शकली नाही. World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही! World Cup : सेमीफायनलमध्ये भारत पुन्हा भगव्या जर्सीत खेळणार? SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात