बर्मिंगहम, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली. रोहितचे वनडेमधील हे 25वे शतक ठरले. या वर्ल्डकपमध्ये रोहितचे हे तिसरे शतक आहे. पण रोहितच्या करिअरमधील हे वेगळं शतक ठरले. संपूर्ण क्रिकेट विश्वात हिटमॅन अशी रोहितची ओळख आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वांना हा हिटमॅन दिसेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. बर्मिंगहम येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतापुढे 337 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने शतकी खेळी केली. पण या शतकात एकाही षटकाराचा समावेश नव्हता. उपकर्णधार असलेल्या रोहितने 109 चेंडूत 102 धावा केल्या. या खेळीत त्याने 15 चौकार मारले. रोहितच्या वनडे करिअरमध्ये असे पहिल्यांदाच झाले की, त्याने शतकी खेळी केली. मात्र त्यात एकाही षटकाराचा समावेश नव्हता. World Cup : भारताच्या पराभवानंतर पाकला झोंबल्या मिरच्या, वकार बरळला याच रोहितच्या नावावर एका सामन्यात 16 षटकार मारण्याचा विक्रम होता. तो विक्रम याच वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या मॉर्गनने मोडला होता. भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनीनंतर रोहितचा क्रमांक लागतो. रोहितने वनडेत 220पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. तर यावेळीच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 7 षटकार मारले आहेत. रोहितचा हा विक्रम पाहता सर्व चाहते नेहमीच त्याच्याकडून षटकाराची अपेक्षा करतात. ‘तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग’; रोहितनं केली बोलती बंद इंग्लंडविरुद्ध भारत 300हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करत होता. त्यामुळे रोहितनेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार त्याने शतकी खेळी केली देखील. पण भारतीयांचा हिटमॅन एकही षटकार न मारता बाद झाला. #MumbaiRainsLive: मुंबईत कुठे वाहतुक कोंडी तर कुठे पाणी साचलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.