जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : शमीची हॅट्ट्रिक तरीही बुमराहने पटकावला सामनावीरचा पुरस्कार!

World Cup : शमीची हॅट्ट्रिक तरीही बुमराहने पटकावला सामनावीरचा पुरस्कार!

World Cup : शमीची हॅट्ट्रिक तरीही बुमराहने पटकावला सामनावीरचा पुरस्कार!

ICC Cricket World Cup : INDvsAFG : मोहम्मद शमीने अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना बाद केलं तर बुमराहने 2 गडी बाद केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

साउथॅम्पटन, 23 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानला पराभूत करून चौथा विजय मिळवला. भारताने 224 धांवांचे रक्षण करत सामन्यात 11 धावा आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. तरीही त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. शमीने 9.5 षटकांत 40 धावांत 4 बळी घेतले. मात्र सामनावीरचा पुरस्कार बुमराहने पटकावला. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने 39 धावांत 2 बळी घेतले होते. त्याने मोक्याच्या क्षणी 2 विकेट घेऊन सामना भारताच्या बाजून झुकवला. एकवेळ अफगाणिस्तान 2 बाद 106 धावा अशा मजबूत स्थितीत होती. त्यावेळी बुमराहच्या दणक्याने त्यांची अवस्था 4 बाद 106 झाली. त्याने रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदीला बाद करून सामन्यावर पकड मिळवली. बुमराहने त्याच्या 10 षटकात फक्त 39 धावा दिल्या. यात एक चौकार आणि एक षटकार मारला. बुमराहने एकही अवांतर धाव दिली नाही. तसेच 49 व्या षटकात त्याने टिच्चून मारा केल्याने अफगाणिस्तानवर दबाव वाढला. त्याने या षटकात सर्व यॉर्कर टाकून फलंदाजांची भंबेरी उडवली. तसेच त्याने फक्त 5 धावा दिल्या. World Cup : विराट भडकला, पंचांच्या निर्णयावर झाला नाराज! भारताने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 213 धावांपर्यंत मजल मारली. या विजयासह भारताचे 9 गुण झाले असून गुणतक्त्यात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा विजय वर्ल्ड कपमधील 50 वा विजय असल्याने हा सामना भारतासाठी खास ठरला आहे. VIDEO : INDvsAFG Match Highlights : शेवटच्या षटकात भारताचा विजय! पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात