VIDEO : India vs Afganistan Match Highlights : शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय!

VIDEO : India vs Afganistan Match Highlights : शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय!

ICC Cricket World Cup 2019 : अफगाणिस्तानला पराभूत करून भारत वर्ल्ड कपमध्ये गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. अफगाणिस्तानला पराभूत करून भारत वर्ल्ड कपमध्ये गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. भारताविरुद्धच्या पराभवामुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. त्यांना 213 धावांपर्यंत मजल मारता आली. शमीने शेवटच्या षटकात केलेल्या हॅट्ट्रिकमुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानकडून रहमत शाह आणि मोहम्मद नबीने सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून शमीने 4 विकेट घेतल्या तर बुमराह, चहल,आणि पांड्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दरम्यान, 225 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची एकवेळ 2 बाद 106 अशी मजबूत स्थिती झाली होती. मात्र, बुमराहने एकाच षटकात रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदीला बाद करून सलग दोन धक्के दिले. त्यानंतर ठराविक अंतराने अफगाणिस्तानचे गडी बाद होत गेले. अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने संघाला 200 धावा करून दिल्या. नबी शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने 52 धावा केल्या.

तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. त्यामुळं दोन शतक आणि एक अर्धशतकी खेळणारा रोहित शर्मा एका धावावर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि विराट यांनी अर्धशतकी भागिदारी केली, मात्र राहुल 30 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी विराट कोहलीनं 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विजय शंकर आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर विजय शंकर 30 धावांवर बाद झाला, त्यानंतर विराट कोहली 67 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. धोनी 28 धावांवर बाद. त्यानंतर फलंदाजांची रांग लागली. हार्दिक पांड्या 7 धावांवर तर, शमी केवळ 1 धावा करत बाद झाला. तर, केदार जाधव अर्धशतकी खेळी करत बाद झाला. अफगाणिस्ताकडून मोहम्मह नबीनं चांगली गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 9 ओव्हरमध्ये 33 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. त्यामुळं भारतानं 224 धावांपर्यंत मजल मारली.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 11:45 PM IST

ताज्या बातम्या