World Cup : विराट भडकला, पंचांच्या निर्णयावर झाला नाराज!

World Cup : विराट भडकला, पंचांच्या निर्णयावर झाला नाराज!

ICC Cricket World Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पायचितचे अपिल फेटाळल्यानंतर भडकलेल्या विराट कोहलीने पंचांसमोर हातसुद्धा जोडले.

  • Share this:

साउथॅम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावेळी पंचांच्या एका निर्णयावरून गोंधळ झाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यामुळे भडकल्याचं दिसलं. त्याने बराचवेळ पंचांशी हुज्जत घातली. अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करण्यास मैदानात उतरला असताना तिसऱ्या षटकात हा गोंधळ झाला. भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या चेंडूवर हजरतुल्लाहच्या पायचितचे अपिल पंचांनी फेटाळून लावलं. अपिल केल्यानंतरही पंच अलीम दार यांनी बाद दिलं नाही. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमी आणि धोनीसोबत चर्चा केली आणि डीआरएसचा घेतला.

रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला न लागता पॅडवर लागल्याचे दिसत होतं. ज्यावेळी चेंडू स्टम्पच्या रेषेत असल्याचं आणि थोडा बाहेर असल्याचं दिसत होतं. यावर तिसऱ्या पंचांनी जाझईला नाबाद ठरवलं. यामुळे भारताने एक रिव्ह्यू गमावला.

पंचांच्या या निर्णयानंतर कोहलीला राग आला. त्याने पंचांना नाबाद देण्याचं कारण विचारलं. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याने चेंडू स्टम्पच्या रेषेत असल्याचं सांगितलं. यावेळी कोहली रागात दिसत होता. त्यावेळी तो पुटपुटतानाही दिसला.

शमीने टाकलेल्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर वाद झाला. शमीने हजरतुल्लाहच्या पायचितचं अपिल केलं. पंचांनी अपिल फेटाळून लावत हजरतुल्लाहला नाबाद ठरवलं. यावेळी कोहलीने रिव्ह्यू घेतला त्यात चेंडू स्टम्पच्या रेषेच्या थोडा बाहेर पड्लायंच दिसलं. त्यानंतर मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर कोहलीने पंचांसोबत याबद्दल चर्चा केली. तेव्हा कोहली रागात दिसत होता.

याआधी आयपीएलमध्ये पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे प्रकार झाले आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे दोघेही आयपीएलमध्ये सामन्यावेळी पंचांवर भडकले होते.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या