लंडन, 12 जून : ICC World Cup 2019मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळं टॉस न होता रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. मात्र आता पावसामुळं एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण पावसामुळं गुणतालिकेत संघांना फटका बसत आहे. श्रीलंकेचा संघ सध्या 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर, बांगलादेशचा संघ 3 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळं वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा पावसामुळं तीन सामने रद्द झाले आहेत.
इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला. या सामन्याचे केवळ 7.3 ओव्हर खेळले गेलेय आता मंगळवारी पुन्हा एकदा पावसामुळं सामना रद्द झाला. श्रीलंका संघाचे यंदाच्यावर्ल्ड कपमधले 4 सामन्यांपैकी 2 सामने पावसामुळं रद्द झाले आहे.
पावसाचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या सामन्यांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयसीसीवर टीका होताना दिसत आहे. त्यामुळं पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहतेही विचारत आहेत. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी, ''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'', असे स्पष्टीकरण दिले आहे.
"Factoring in a reserve day for every match at the ICC Men’s Cricket World Cup would significantly increase the length of the tournament and practically would be extremely complex to deliver."
Statement from David Richardson ⬇️ https://t.co/OEOXAJ4h8h
— ICC (@ICC) June 11, 2019
गरज पडल्यास बाद फेरींसाठी राखीव दिवस
तसेच आयसीसीनं लीग स्टेजसाठी नाही कर बाद फेरींसाठी राखीव दिवस ठेवले असल्याचे सांगितले आहे. ''इंग्लंडमध्ये जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळं बाद फेरीच्या सामन्यांसाठी आम्ही राखीव दिवस ठेवला आहे,'' अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली.
वाचा-वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का
वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा
वाचा- World Cup : पाकच्या कर्णधाराने केली भारतीय चाहत्यांवर टीका
SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?