लंडन, 11 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा बुधवारी ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने भारतीय चाहत्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. सर्फराजला विचारण्यात आलं की, पाकिस्तानी चाहते जर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला हूटिंग करू लागले तर तु विराट कोहलीसारखे करशील का? त्यावर सर्फराजने उत्तर दिलं की, मला नाही वाटत पाकिस्तानी चाहते असं काही करतील. ते क्रिकेटवर आणि खेळाडूंवर प्रेम करतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यावेळी स्टीव्ह स्मिथ सीमारेषेवर तैनात होता. तेव्हा स्मिथला प्रेक्षकांनी चिडवायला सुरूवात केली. प्रेक्षकांनी चीटर चीटर असं म्हणायला सुरूवात करताच भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांना थांबवलं. चाहत्यांना असं म्हणू नका सांगताना विराट कोहलीने चाहत्यांच्यावतीने स्मीथची माफीही मागितली.
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद म्हणाला की, आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी तयार आहोत. युएईत झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 5-0 ने विजय मिळवला असला तरी तो भूतकाळ आहे. आम्ही त्याचा विचार करत नाही. आता संघ बुधवारच्या सामन्याबद्दल विचार करत आहे.
पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. तर यजमान इंग्लंडवर 14 धावांनी विजय मिळवला होता. लंकेविरुद्धच्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला होता.
वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर
वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट
पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या