World Cup : भारतच होणार जग्गजेता, शिलेदारांची 'विराट' कामगिरी!

World Cup : भारतच होणार जग्गजेता, शिलेदारांची 'विराट' कामगिरी!

ICC Cricket World Cup 2019 : भारताने चार विजयासह 9 गुण मिळवले असून गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

  • Share this:

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारताने पाचपैकी चार सामन्यात विजय मिळवला असून गुणतक्त्यात 9 गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजलं जात असून वर्ल्ड कपमध्ये सर्वात संतुलित असलेला संघ भारताचा आहे. अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीत भारत कमी पडला. याव्यतिरिक्त वर्ल्ड कपमधील चार सामन्यात भारताने सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारत मजबूत आहे. दरम्यान, भारताचे दोन खेळाडू आतापर्यंत दुखापतीने काही सामन्यात खेळू शकले नाहीत. तरीसुद्धा भारताने एकही सामना गमावला नाही.

सलामीवीर शिखर धवनला दुखापतीने स्पर्धेला मुकावे लागले. त्याच्या जागी सलामीला केएल राहुलला संधी देण्यात आली. राहुलने पाकिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करत अर्धशतकी खेळी केली होती. हिटमॅन रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये दोन शतके केली आहेत. तो जगातील सर्वोत्तम सलामीवर असून पाकिस्तानविरुद्ध त्याने 140 धावांची खेळी केली होती. या जोरावर भारताने पाकिस्तानला 336 धावांचे आव्हान दिले होते.

भारताचा कर्णधार विराट कोहली जगातला एक नंबरचा फलंदाज आहे. नुकताच त्याने वेगवान 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने तीन अर्धशतके केली आहेत. याशिवाय भारताकडे सर्वात अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आहे. त्याच्या यष्टीरक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा संघाला वेळोवेळी होत आहे. धोनीच्या फलंदाजीवरून जरी टीका होत असली तरी त्याचा अनुभव दबावाच्या वेळी महत्त्वाचा ठरत आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्यात कोहलीला धोनीची मदत होते. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवने वर्ल्ड कपमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे.

केएल राहुल सलामीला खेळत असल्याने अफगाणिस्तानविरुद्ध विजय शंकरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याशिवाय गोलंदाजीतही चमक दाखवली. तर भुवनेश्वरच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद शमीने पहिल्याच सामन्यात 4 गडी बाद केले. याशिवाय रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा या खेळाडूंना अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची आणि कोणाला बाहेर बसवायचं याचा निर्णय घेणं कठीण जाणार आहे.

जगातला नंबर एकचा गोलंदाज असलेल्या बुमराहने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने 187 धावा दिल्या असून यात एक नो ब़ॉल आणि एक वाईड बॉलची धाव आहे. वेगवान गोंलदाज भुवनेश्वर कुमारने 3 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. त्याला दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळता आले नाही. त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. वर्ल्ड कपमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शमीने हॅट्ट्रिक केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांमध्ये चहलने स्पर्धेत 8 विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने 3, शमी आणि पांड्याने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या आहेत. पांड्याने 4 सामन्यात फलंदाजी करताना 96 धावासुद्धा केल्या आहेत.

शिखर धवन स्पर्धेला मुकल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये विजय शंकरला संधी मिळाली. दरम्यान पाकविरुद्ध भुवनेश्वरला दुखापतीने अर्धवट षटक सोडून जावं लागलं. त्यानंतर विजय शंकरने त्याच्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन गोलंदाजीतही चमक दाखवून दिली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन सामन्यात 44 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड कपमधील सर्वात संतुलित संघ असल्याने भारतासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेल्या खेळाडूंशिवाय भारताकडे राखीव खेळाडूसुद्धा चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या काही सामन्यात दुखापतीने बाहेर झालेल्या खेळाडूंच्या जागी संघात घेतलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. संघ फक्त एका खेळाडूवर अवलंबून नसल्यानं सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतच जग्गजेता होईल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

World Cup : गोलंदाजांच्या कामगिरीने विराटची डोकेदुखी वाढली!

भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. भारताचे उर्वरित सामने वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यात इंग्लंड वगळता इतर संघाविरुद्ध भारत नक्कीच सरस आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना 30 जूनला होणार आहे. दरम्यान त्याआधी बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारत लढेल.

सेमिफायनलला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत पोहचतील असा अंदाज लावला जात आहे. सध्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने सेमिफायनल गाठल्यास या तीन संघापैकी एकासोबत सामना होईल.

World Cup : इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा, स्पर्धेतून बाहेर होणार?

World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर?

VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स

First published: June 24, 2019, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading