भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

ICC Cricket World Cup आतापर्यंत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.

  • Share this:

लंडन, 10 जून : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरूवात केली आहे. गुरुवारी भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार असून 16 जूनला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत लढत होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. दुसऱीकडे पाकिस्ताने जागितक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवर विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला आहे.

भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने त्याचा आवडता संघ कोणता ते सांगितलं आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड कपच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हे चित्र बदलू शकतं असंही अख्तरने म्हटलं.

मॅनचेस्टरमधील ओल्ड ट्रेफर्डवर 16 जूनला भारत-पाक सामना होणार आहे. त्यापूर्वी त्याने म्हटलं की, भारतीय संघाला जर पाकिस्तानने पराभूत केलं तर त्याचा आवडता संघ बदलू शकतो. तसेच पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. त्यात विजय मिळवल्यास आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल.

भारत पाक यांच्यात सामना होईपर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आवडता आहे. पण पाकिस्तान त्यांना जड जाऊ शकतो. याआधी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास भारताविरुद्ध त्यांची कामगिरी उंचावेल आणि ते भारताविरुद्ध जिंकतील असंही शोएब अख्तर म्हणाला.

पाकिस्तानने भारताविरुद्ध आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवलेला नाही. दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये एकमेकांविरोधात 6 सामने खेळले असून त्यात प्रत्येकवेळी भारताने विजय मिळवला आहे. सर्वात पहिल्यांदा भारताने पाकिस्तानला 1992 मध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं आहे.

वाचा- तब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग

वाचा-रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला जिंकवून दिला होता युवराजनं वर्ल्ड कप

क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

First published: June 10, 2019, 11:12 PM IST

ताज्या बातम्या